प्रीतीच्या परदेशवारीला परवानगी!
By Admin | Updated: July 1, 2014 01:34 IST2014-07-01T01:34:08+5:302014-07-01T01:34:08+5:30
उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणा:या अभिनेत्री प्रीती ङिांटाला पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी परदेशवारीची परवानगी दिली.

प्रीतीच्या परदेशवारीला परवानगी!
>प्रीती-नेस प्रकरण : आयुक्तांशी तासभर चर्चा
मुंबई : उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणा:या अभिनेत्री प्रीती ङिांटाला पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी परदेशवारीची परवानगी दिली. या परवानगीसाठी तिने आज पोलीस आयुक्तालयात मारिया यांची भेट घेतली. या वेळी वाडिया कुटुंबीयांना गँगस्टर रवी पुजारीकडून मिळालेल्या धमक्यांबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
नेस यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर प्रीती लागलीच अमेरिकेला रवाना झाली होती. तिची तक्रार त्रोटक असल्याने पोलिसांना तिचा पुरवणी जबाब नोंदवावा लागला. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत प्रीतीने नेस यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर मरिन ड्राइव्ह पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत समाधान व्यक्त केल्याचे समजते. याबाबत मारिया यांना विचारले असता आमचा तपास सुरू आहे. प्रीतीने दिलेल्या सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदविल्यानंतर नेस यांची बाजू ऐकून पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रीतीने काही परदेशी नागरिकांची नावे साक्षीदार म्हणून घेतली होती. त्या सर्वाना मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ईमेल धाडून घडल्या प्रकाराची माहिती देण्याचे आवाहन केले होते. त्याला दोघांनी प्रतिसाद दिला आहे. (प्रतिनिधी)