शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

औषधी सहायक आयुक्तांच्या बदलीला कायम स्थगिती , ‘मॅट’चा दिलासा, म्हणे, हा तर सरकारचा चावटपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 04:51 IST

अवघ्या काही दिवसांत एकाच व्यक्तीचे बदल्यांचे आदेश काढणे म्हणजे हा सरकारचा चावटपणा आहे, असे सांगत मुंबई ‘मॅट’ने अन्न व औषधी प्रशासन विभागातील गंभीर प्रकरणांची चौकशी

यवतमाळ : अवघ्या काही दिवसांत एकाच व्यक्तीचे बदल्यांचे आदेश काढणे म्हणजे हा सरकारचा चावटपणा आहे, असे सांगत मुंबई ‘मॅट’ने अन्न व औषधी प्रशासन विभागातील गंभीर प्रकरणांची चौकशी करणा-या एका महिला सहायक आयुक्तांच्या बदलीला कायम स्थगिती दिली.माधुरी मनोहर पवार असे या अधिका-याचे नाव आहे. त्या सहायक आयुक्त (औषधी) या पदावर कार्यरत आहेत. राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त म्हणून निवड झालेल्या माधुरी पवार यांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या मुंबईतील आयुक्तालयात तीन वर्षे पूर्ण केली. त्यांची ३१ मे २०१७ ला ठाणे येथे बदली करण्यात आली. ६ जून २०१७ ला त्या तेथे रुजू झाल्या. मात्र त्यानंतर विशिष्ट हेतूने दीडच महिन्यात त्यांची १९ जुलै २०१७ ला अचानक बीड येथे बदली करण्यात आली. त्यांच्या ठाणेतील जागेवर लातूर येथील समकक्ष पी.व्ही. पवार यांना आणण्यात आले. माधुरी पवार यांनी दीड महिन्यात झालेल्या आपल्या बदलीला अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र  प्रशासकीय न्यायाधीकरण) आव्हान दिले. तत्कालीन उपाध्यक्ष आर.बी. मलिक यांनी ८ आॅगस्ट २०१७ ला त्यांच्या बदलीला अंतरिम स्थगनादेश दिला.माधुरी पवार यांचे प्रकरण आता ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांच्यापुढे आले असता प्रकरणाला कलाटणी मिळेल, अशी काही नवीन कागदपत्रे अथवा मुद्दा तुमच्याकडे आहे का, अशी विचारणा सरकारी वकिलांना करण्यात आली. मात्र नवे काहीच नसल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले. त्यावर माधुरी पवार यांच्या बदलीबाबत अन्न व औषधी प्रशासन आयुक्तालयाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळे आदेश काढणे म्हणजे सरकारचा चावटपणा आहे असे निरिक्षण ‘मॅट’ने नोंदविले. माधुरी यांच्या बदलीमागे कोणतेही संयुक्तीक कारण शासन देऊ शकलेले नाही, असे नमुद करीत न्या. जोशी यांनी माधुरी पवार यांच्या बदलीच्या अंतरिम स्थगितीला कायम स्थगितीचा आदेश देऊन १६ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रकरण निकाली काढले. प्रकरणात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून के.बी. भिसे यांनी काम पाहिले. तर लातूर येथील सहायक आयुक्त पी.व्ही. पवार यांच्यावतीने अ‍ॅड. एम.आर. पाटील यांनी काम पाहिले.बदली आदेशाची १४ महिन्यानंतर अंमलबजावणी- वास्तविक मे २०१६ मध्ये माधुरी पवार यांची मुंबईहून बीडला रिक्त जागेवर बदली झाली होती. त्या या बदलीसाठी मुंबईत सलग सहा वर्षे झाल्याने पात्रही होत्या. मात्र हा बदली आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. तो एफडीए मुख्यालयातच पडून राहिला. शिवाय या आदेशाबाबत एफडीए आयुक्तालयाकडूनही माधुरी पवार यांना कधी विचारणा झाली नाही.- दरम्यान सुलोचने नामक अधिकाºयाची मुंबईहून प्रतिनियुक्तीवर बीडला बदली करण्यात आली होती. काम बीडमध्ये पगार मुंबईतून असा प्रकार नऊ महिने चालला. मात्र मेमध्ये नियमित साताºयाला बदली करून घेत त्यांनी आपली सुटका करून घेतली.- मे २०१६ मध्ये माधुरी पवार यांची मुंबईहून बीडला बदली करण्यात आली होती. या आदेशाची अंमलबजावणी चक्क जुलै २०१७ मध्ये करण्यात आली. त्यावर ‘मॅट’ने आक्षेप नोंदविला.सिनेअभिनेत्रीच्या ड्रग्ज तस्करीची चौकशीसहायक औषधी संचालक माधुरी पवार यांच्या धाडसत्रामुळे अनेक औषध कंपन्या अडचणीत आल्या होत्या. सिनेअभिनेत्री ममता कुळकर्णी यांचे ड्रग्ज तस्करीचे प्रकरणही माधुरी यांच्याकडेच चौकशी व तपासाला होते. यातूनच अनेकांचे हितसंबंध दुखावल्याने अखेर माधुरी पवार यांची राजकीय दबावातून बदली करून घेतली गेल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार