पेप्सिको कंपनी नांदेडमध्ये फळ प्रक्रिया प्रकल्प उभारणार
By Admin | Updated: March 1, 2017 04:52 IST2017-03-01T04:52:41+5:302017-03-01T04:52:41+5:30
पेप्सिको कंपनी महाराष्ट्र शासनाबरोबर सहकार्य करून कृषी तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार

पेप्सिको कंपनी नांदेडमध्ये फळ प्रक्रिया प्रकल्प उभारणार
मुंबई : पेप्सिको कंपनी महाराष्ट्र शासनाबरोबर सहकार्य करून कृषी तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असून कंपनी नांदेडमध्ये सुमारे १८० कोटी रु पये गुंतवणूक करु न फळ प्रक्रि या प्रकल्प उभारणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पेप्सिको कंपनीच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांच्यात चर्चा झाली.
खेड्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनचे नुयी यांनी कौतुक करून त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शविली. कुशल मनुष्यबळ विकासासाठी महाराष्ट्र शासन व पेप्सिको कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
नांदेडच्या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पेप्सिकोच्या आशिया, मध्यपूर्व व उत्तर आफ्रिका विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चड्डा, पेप्सिको इंडियाचे चेअरमन शिव कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.
फडणवीस यांनी पेप्सिको कंपनीच्या गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त करून या प्रकल्पासाठी राज्य शासन मदत करणार असल्याचे सांगितले. नुयी म्हणाल्या की, महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचे राज्य असून येथे सुमारे १२ हजार कोटी रु पयांची गुंतवणूक करण्याचा मानस आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यात शीतपेयासाठी लागणाऱ्या लिंबूवर्गीय फळांचे क्लस्टर तयार करणार आहे.
कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर व पेप्सिको इंडियाचे चेअरमन शिव कुमार यांनी करारावर स्वाक्षरी केली. (विशेष प्रतिनिधी)