शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

‘पाणी’दार राज्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:27 IST

जल, जमीन आणि जंगलांचे संवर्धन झाल्यास शेतकºयांना कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही. यामधून राज्य सुजलाम, सुफलाम होईल. राज्य ‘पाणी’दार करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून जनसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

पुणे : जल, जमीन आणि जंगलांचे संवर्धन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही. यामधून राज्य सुजलाम, सुफलाम होईल. राज्य ‘पाणी’दार करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून जनसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.‘पानी फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१७’ स्पर्धचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलामध्ये झाला. अभिनेता शाहरूख खान, जलसंधारणमंत्री राम शिंदे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी, जमनादेवी बजाज ट्रस्टचे राजीव बजाज, टाटा ट्रस्टचे आर. वेंकट, पिरामल फाऊंडेशनचे अजय पिरामल, एचडीएफडीसीच्या झिया लालकाका, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती’वर भर दिला असून सरकारी योजना या जनतेच्या योजना झाल्याशिवाय यशस्वी होत नाहीत. जलसंवर्धनासारखे कोणतेही मोठे काम नाही. पानी फाऊंडेशनचे काम मोठे असून राज्य शासन या उपक्रमाच्या पाठिशी आहे. एका व्यक्तीने मनात आणल्यानंतर काय होऊ शकते, हे आमिर खानने दाखवून दिले आहे. जनतेनेही त्यांची ताकद या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिली.‘पानी फाऊंडेशन’चे काम असेच सुरू राहिले तर दोन वर्षांत म्हणजे २०१९पर्यंत महाराष्ट्र जलयुक्त दिसेल. सरकारच्या वतीने स्पर्धकांना साडेसहा कोटींची बक्षीसे जाहीर केली आहेत, असेही फडणवीस म्हणालेशाहरुख खान म्हणाला, पानी फाऊंडेशनने हा विचार कृतीतून सत्यात उतरविला आहे. यामध्ये खरे यश शेतकºयांचे असून त्यांच्या मेहनतीचेच हे फळ आहे. नीता अंबानी म्हणाल्या, आमिरने सुरू केलेली मोहीम आता लोकचळवळ झाली आहे.पंचमहाभूते निसर्गाचे महत्त्वाचे घटक आहेत. पाणी आपले भेदभाव न करता संगोपन करीत असते.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना आमिर म्हणाला, एवढ्या गावांतून लोक आल्याचा आनंद आहे. हे सगळे काम तुमच्या मेहनतीचे फळ आहे. पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ म्हणाले, आपण सर्वांनी मिळून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे धाडसी स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी लोकांची वज्रमूठ करावी लागेल.वर्ध्यातील कक्कडदरा पहिल्या बक्षिसाचे मानकरीवर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कक्कडदरा गाव प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरून त्यांनी जलकरंडक पटकावला. गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर ३० लाखांचा द्वितीय क्रमांक सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील भोसरे आणि बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील जायभायेवाडी या गावांना विभागून देण्यात आला. माण (जि. सातारा) तालुक्यातील बिदाल आणि केज(जि. बीड) तालुक्यातील पळसखेडा या गावांना २० लाख रुपयांचे तिसºया क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले.