शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'लोकांनी तुम्हाला राम मंदिर बांधायला निवडून दिलेय, तिहेरी तलाकचा कायदा करायला नव्हे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 09:00 IST

जीएसटी’साठी मध्यरात्री संसदेत बैठक होते मग राम मंदिरासाठी का नाही?

परभणी: देशातील जनेतेने अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भाजपाला निवडून दिलेय, तिहेरी तलाकचा कायदा करायला नव्हे, अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडीया यांनी सरकारवर हल्ला चढवला. तोगडीया हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत.  ते शुक्रवारी परभणी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदी आणि सरकारला लक्ष्य केले.‘जीएसटी’साठी मध्यरात्री संसदेत बैठक होते मग राम मंदिरासाठी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकार कोणाचेही येवो; पण राममंदिर झाले पाहिजे. कारण आम्हाला राम मंदिर प्रिय आहे, असे तोगडीया यांनी सांगितले.मात्र, आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. परंतु राम मंदिराच्या उभारणीत येणारे अडथळे पाहता त्यासाठी सरकारने संसदेत कायदाच मंजूर केला पाहिजे. त्यामुळे राम मंदिराची उभारणी त्वरेने पूर्ण होईल. मात्र, या मंदिराच्या बाजूला मशिद असू नये, अशी मागणीही तोगडीया यांनी केली. देशामध्ये हिंदू अल्पसंख्याक होण्याची भीती आहे. अशावेळी सत्तास्थानी हिंदूच असले पाहिजेत. पंतप्रधानांसारख्या जबाबदारीच्या पदावर हिंदू व्यक्तीच विराजमान व्हावी मग भलेही ती कोणत्या का पक्षाची असेना, असेही तोगडीया यांनी या वेळी स्पष्ट केले. डॉ. तोगडीया हे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रकाश लाखरा यांच्या विवाहासाठी येथे आले होते. औरंगाबादहून येथे आल्यानंतर दत्त नगरातील प्रल्हाद कानडे यांच्या निवासस्थानी त्यांनी शहरातील व्यापारी व इतर घटकांशी संवाद साधला.काही दिवसांपूर्वी एका खटल्याप्रकरणी पोलीस तोगडीया यांना अहमदाबादमध्ये अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यावेळी तोगडिया संपूर्ण दिवस गायब झाले होते. त्यानंतर ते एका रुग्णालयात बेशुद्धाअवस्थेत सापडले होते. या घटनेनंतर तोगडिया यांनी राजस्थान पोलिसांना आपला एन्काऊंटर करायचा होता, असा आरोप केला होता. या घटनेनंतर पोलिसांकडून त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच औरंगाबादच्या दौऱ्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी 700 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये तोगडिया यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी एका विशेष पोलीस पथकासह 2 जिल्हा पोलीस अधिक्षक, 4 पोलीस सहआयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 24 सह पोलीस निरीक्षक आणि 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडियाRam Mandirराम मंदिरtriple talaqतिहेरी तलाकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी