शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली की वाईट?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

By कुणाल गवाणकर | Updated: January 15, 2021 22:09 IST

देशातील टॉप ५ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रं हाती घेऊन जवळपास सव्वा वर्षांचा कालावधी होत आला आहे आहे. या कालावधीत सरकारला कोरोना संकटाचा सामना करावा लागला. याशिवाय अभिनेत्री कंगना राणौत, पत्रकार अर्णब गोस्वामी, सक्तवसुली संचलनालयाची कारवाई, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही सरकारची कामगिरी चांगली झाल्याचं एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडत थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. यानंतर कोरोना पाठोपाठ अवकाळी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती अशा संकटांचा सामना राज्याला करावा लागला. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री ठाकरेंची कामगिरी चांगली झाल्याचं आकडेवारी सांगते.“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”मुख्यमंत्री ठाकरेंच्या कामगिरीबद्दल जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. राज्यातील ४६ टक्के लोक मुख्यमंत्र्यांच्या कामावर खूप समाधानी आहेत. तर ३२ टक्के लोक समाधानी आहेत. २० टक्के जनता ठाकरेंच्या कारभारावर असमाधानी आहे. देशात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी आहेत. या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कारभारावर ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या (७८ टक्के), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी तिसऱ्या (६७ टक्के) स्थानी आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर ५८ टक्के लोक संतुष्ट आहेत. विशेष म्हणजे पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयKangana Ranautकंगना राणौतarnab goswamiअर्णब गोस्वामी