कोल्हापूरच्या जनतेची अखेर टोलधाडीतून सुटका
By Admin | Updated: February 4, 2016 13:38 IST2016-02-04T13:31:09+5:302016-02-04T13:38:52+5:30
कोल्हापूरकरांची अखेर टोलधाडीतून सुटका झाली आहे. राज्यातील युती सरकारने कोल्हापूरातील टोल नाके बंद करण्याची घोषणा केली होती.

कोल्हापूरच्या जनतेची अखेर टोलधाडीतून सुटका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - कोल्हापूरकरांची अखेर टोलधाडीतून सुटका झाली आहे. राज्यातील युती सरकारने कोल्हापूरातील टोल नाके बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गुरुवारी कोल्हापूरातील टोल नाके बंद करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली.
कोल्हापूरातील टोल नाके बंद करावेत यासाठी मागच्या दोन वर्षांपासून कोल्हापूरातील जनतेचा संघर्ष सुरु होता. या टोलधाडीविरोधात कोल्हापूरकरांनी न्यायालयीन लढाही दिला. प्रसंगी हिंसक संघर्षही झाला. कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण अधिसूचना काढली नव्हती.
राज्य सरकार हा प्रकल्प ‘आयआरबी’चे सर्वच्या सर्व म्हणजे ४२८ कोटी रुपये देऊन विकत घेणार आहे. त्या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाने तसे पत्र ‘आयआरबी’ला दिले आहे.