शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

भाजपातील लोक भीतीपोटी समोर येऊन बोलत नाहीत!, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत  

By रवी ताले | Updated: October 18, 2017 04:31 IST

भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते माझ्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ‘लोकमत’शी बोलताना केला.

अकोला : भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते माझ्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ‘लोकमत’शी बोलताना केला.अकोला येथे एका व्याख्यानासाठी आलेल्या सिन्हा यांनी सध्याच्या राजकारणापासून अर्थकारणापर्यंत अनेक विषयांवर ‘लोकमत’शी संवाद साधला. या मुलाखतीचा संपादित अंश-प्रश्न: काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय दैनिकात ‘मी आता बोलायलाच हवे!’ या शीर्षकाचा लेख लिहून आपण खळबळ उठवून दिली. ती का?सिन्हा: मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. गत अनेक दिवसांपासून देशात जे काही चाललयं ते मी एक मूकदर्शक बनून बघत होतो. पण जे काही होत आहे ते ठीक नाही, याची जाणीव झाल्याने मी तो लेख लिहिला. देशभरातून त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. मी नेमके दुख-या नसेवर बोट ठेवले. माझ्या पक्षातील अनेकांनी माझ्या भूमिकेचे स्वागतच केले. तुम्ही पुढाकार घेतला हे बरे केले, अशीच अनेकांची प्रतिक्रिया होती; परंतु पक्षातील लोक कुठे तरी भयभीत आहेत, हे माझ्या लक्षात आले. मी त्यांना सांगतोय, की असे घाबरून चालणार नाही. लोकशाही आणि भय एकत्र नांदू शकत नाहीत. भय झुगारण्याची गरज आहे.प्रश्न:पक्षातील किती लोक आपल्या सोबत आहेत?सिन्हा: खूप लोक सहमत आहेत; मात्र ते उघडपणे बोलायला तयार नाहीत. घाबरतात.प्रश्न: आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीचे निदान केले आहे, तिच्या भवितव्याविषयी मतप्रदर्शन केले आहे. मग स्वपक्षाच्या भविष्याविषयी आपल्याला काय वाटते?सिन्हा: या विषयावर मी फार टिप्पणी करणार नाही. लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे. राजकारणात परिस्थिती अचानक अनुकूल होते, अचानक प्रतिकूल होते. त्यामुळे मी या घडीला त्या संदर्भात भविष्यवाणी करणार नाही; परंतु हे लक्षात घेतले पाहिजे, की आताच आलेल्या बातमीनुसार, भाजपाचा गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराजय झाला आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काय झाले, ते तुम्हाला ज्ञातच आहे. तिथे आमच्या जागा वाढल्या, असे काही लोक म्हणू शकतात. त्यामुळे निवडणूक निकाल सोडून द्या; पण जनतेमध्ये कुठे तरी निराशेची भावना व्याप्त आहे, हे मला सतत जाणवत आहे.प्रश्न: भाजपात हुकुमशाही आहे, असे आपल्याला वाटते का?सिन्हा: हुकुमशाही आहे किंवा नाही, ते सोडा; पण तुम्ही बघा, नुकतेच आमचे मित्र अरुण शौरी असे म्हणाले, की अडीच लोक पक्ष आणि सरकार चालवित आहेत. शत्रुघ्न सिन्हाही तेच बोलले, की दोन लोकच पक्ष चालवित आहेत.प्रश्न: सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते?सिन्हा: मला वाटते, ‘बँकांचे नॉन परफॉर्मिंग असेट्स’ म्ह्णजेच फसलेली कर्जे, ही सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या साडेतीन वर्षात आम्ही एनपीए नियंत्रणात आणू शकलेलो नाही. त्यामुळेच खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढलेली नाही.प्रश्न: आपल्या सध्याच्या हालचाली आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या १९८७-८८ मधील हालचाली, यामध्ये बरेच साम्य दिसते.सिन्हा: (हसत हसत) तुम्ही खूप पुढचा विचार करीत आहात!

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाIndiaभारत