प्रभागरचनेबाबत नागरिकांना उत्कंठा

By Admin | Updated: September 6, 2016 01:23 IST2016-09-06T01:23:23+5:302016-09-06T01:23:23+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार असून, प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले

People are passionate about Prabhakracha | प्रभागरचनेबाबत नागरिकांना उत्कंठा

प्रभागरचनेबाबत नागरिकांना उत्कंठा


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार असून, प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गुगल मॅपवर प्रगणकाचे गट बसवून प्रभागाच्या सीमांकनाचे काम करण्यात निवडणूक विभागाचे अधिकारी मग्न आहेत. येत्या सात सप्टेंबरला त्रिसदसयीस समितीला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभागरचनेबाबत मतदार आणि उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अधिसूचना प्रकाशित केली असून, २०११च्या जनगणनेनुसार निवडणूक होणार आहे. प्रभागानुसार निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सूचित केल्याने प्रभागरचनेचा आराखडा बुधवारी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे प्रभागरचना अंतिम करण्यासाठी निवडणूक विभागाची लगबग सुरू आहे. गोपनीयपणे हे काम सुरू असून, कमालीची गुप्तता निवडणूक विभागाने ठेवली आहे.
सीमांकनाची लगबग सुरू
तळवडेकडून पहिला प्रभाग सुरू होणार असून, सांगवीत शेवटचा प्रभाग असणार आहे. गुगल नकाशावर प्रगणक गटांच्या सीमा दर्शविणे, प्रगणकांच्या गटांना क्रमांक देणे, प्रगणक गटाची लोकसंख्या दर्शविणे हे काम सुरू आहे. जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शविण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
>सात सप्टेंबरला आरक्षणाची सोडत
महापालिकेच्या निवडणूक विभागाने तयार केलेला प्रभागरचनेचा आराखडा बुधवारी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडे जाईल. या समितीकडून प्रभागरचनेचा आढावा घेतला जाईल. ७ आॅक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. आराख्यात योग्य त्या दुरुस्त्या करून १२ सप्टेंबरला तो निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून २३ सप्टेंबरपर्यंत याला मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर १० ते २५ आॅक्टोबरच्या दरम्यान प्रभागरचनेवर हरकती नोंदविता येणार आहेत.

Web Title: People are passionate about Prabhakracha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.