पेण नगरपालिका होणार चकाचक
By Admin | Updated: May 21, 2016 03:22 IST2016-05-21T03:22:59+5:302016-05-21T03:22:59+5:30
शासकीय कार्यालयात स्वच्छता राहावी यासाठी राज्य शासनाने १६ मे ते ३१ मेपर्यंत मान्सूनपूर्व कार्यालयीन स्वच्छता मोहीम राबविल्याचा संकल्प केला

पेण नगरपालिका होणार चकाचक
पेण : स्वच्छ भारत अभियानाचा पूरक भाग म्हणून शासकीय कार्यालयात स्वच्छता राहावी यासाठी राज्य शासनाने १६ मे ते ३१ मेपर्यंत मान्सूनपूर्व कार्यालयीन स्वच्छता मोहीम राबविल्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार गुरु वारी पेण नगर प्रशासनाच्या सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पालिका प्रशासनाच्या इमारतीच्या कार्यालयीन खोल्या, प्रशस्त दालन व पेण नगर पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील व्हरांड्याची स्वच्छता करु न उपक्रमाची सुरु वात केली.
या स्वच्छता पंधरवड्यात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेवून यापुढे आपले कार्यालयीन दालन स्वच्छ नीटनेटके कसे राहिल याबाबत सतर्क राहणार आहेत. कार्यालयातील शासकीय दस्ताऐवजाचे मूल्य पाहता या फाईल्स, कागदपत्रे नीटनेटके रचून ठेवणे, फाईलींच्या कामाचे अल्फाबेटीकल वर्गीकरण करून कामकाजाच्या वेळेस त्या चटकन काढता येतील अशी व्यवस्था करणे, अनावश्यक कामकाजांची कागदपत्रे डस्टबीनमध्ये अथवा त्याची दैनंदिन विल्हेवाट लावणे, कार्यालयीन कामकाजासाठी दररोज येणारे शेकडो नागरिकांना व्हरांड्यात स्वच्छता दिसावी म्हणून तो परिसर दररोज स्वच्छ ठेवणे. याबरोबर या कार्यालयीन इमारतीत असणारी स्वच्छतागृहे विशेष लक्ष देवून अधिकारीवर्गाने ती दररोज स्वच्छ केली जातील याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.
स्वच्छता उपक्रमात मुख्याधिकारी पाटील जातीने लक्ष घालून स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झाले होते. दयानंद गावंड, शिवाजी चव्हाण आदी कर्मचारी सहभागी झाले होते.