पेहरन-ए-शरीफ उत्सवाची जय्यत तयारी , १०० वर्षांची परंपरा

By Admin | Updated: October 15, 2016 17:51 IST2016-10-15T17:49:28+5:302016-10-15T17:51:03+5:30

राज्यात केवळ यावल येथेच साजरा होत असलेला ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव १६ आॅक्टोबर रोजी येथे आयोजीत केला आहे. या उत्सवास सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे

Pehran-e-Sharif celebrates the birth anniversary of the celebration, the tradition of 100 years | पेहरन-ए-शरीफ उत्सवाची जय्यत तयारी , १०० वर्षांची परंपरा

पेहरन-ए-शरीफ उत्सवाची जय्यत तयारी , १०० वर्षांची परंपरा

ऑनलाइन लोकमत
यावल, दि. १५ -  राज्यात केवळ यावल येथेच साजरा होत असलेला ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव १६ आॅक्टोबर रोजी येथे आयोजीत केला आहे. या उत्सवास सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार दरवर्षी मोहरमच्या १४ तारखेस उत्सव साजरा होतो. उत्सवासाठी राज्यासह परराज्यातील मुस्लीम बांधव आपल्या नातलगाकडे हजेरी लावतात. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप येते.यावर्षी उत्सवाचे आयोजन बाबुजीपुरा उत्सव समीतीने केले आहे.
जस्र पेहरन शरीफ उत्सवामागील हकिकत अशी की, येथील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र)असे म्हणतात. याच पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून वाद्यवृंदाच्या गजरात धार्मिक गीत गात मिरवणूक काढली जाते. हिंदू-मुस्लीम बांधव उत्सवात सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणूकीदरम्यान पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघतांना भाविक मन्नत (मागणे) मागतात. ती हमखास पूर्ण होते अशी हिंदू-मुस्लीम भाविकांची श्रध्दा आहे.या निमित्त संपूर्ण शहर हिरव्या पताकांनी सजविण्यात आले. दुकानांवर रोषणाई करण्यात आली आहे. समिती अध्यक्षपदी मोहम्मद हकिम मोहम्मद याकूब, उमरखान परवेजखान मोहसीनखान. सचिवपदी अयुबखान फजलू रहेमानखान, यांच्यासह विश्वस्थ आहेत. विविध पंच कमिटी नियुक्त करण्यात आली.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी होणारी कुस्त्यांची आमदंगल या वर्षीही हडकाई नदीपात्रात दुपारी होईल. कुस्ती लढण्यासाठी बऱ्हाणपूर, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळ्यास जिल्हयातील मल्ल येथे हजेरी लावतात.

Web Title: Pehran-e-Sharif celebrates the birth anniversary of the celebration, the tradition of 100 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.