पीककर्ज वसुलीला स्थगिती

By Admin | Updated: November 28, 2014 01:47 IST2014-11-28T01:47:05+5:302014-11-28T01:47:05+5:30

पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़

Peakkor Vasuli stay | पीककर्ज वसुलीला स्थगिती

पीककर्ज वसुलीला स्थगिती

मुख्यमंत्र्यांची घोषणा : वीजबिलाची पूर्ण माफी नाही; 2 हजार नवे ट्रान्सफॉर्मर घेणार
औरंगाबाद : पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़ तर शेतक:यांना कृषीबिलात केवळ साडतेहतीस टक्के सूट देणार असून, उर्वरित रक्कम शेतक:यांना भरावी लागणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.  
मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात फडणवीस, महसूलमंत्री खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत विभागातील आमदारांची बैठक घेण्यात आली.  
 बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, मराठवाडय़ात यंदा हायड्रोलिक (पाण्याचा) दुष्काळ नाही मात्र शेतीचा दुष्काळ आहे. अंतिम पंचनामे झाल्यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल़ मात्र यंदा केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती त्यानुसार पहिल्यांदाच केंद्राने पंचनामे न करण्याची सूट दिली आहे. राज्यात 5क् टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 19 हजार गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात विजेचे  22क्क् ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. 7क्क् ट्रान्सफॉर्मर पुढील सात दिवसांत बसविण्याचे व नवीन 2 हजार ट्रान्सफॉर्मर तातडीने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. शेतक:यांचे वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. ज्या ट्रान्सफॉर्मरवरील शेतकरी 7क् टक्के वीजबिल भरतील त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लावण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी) 
 
कर्मचा:यांवर जिल्हाधिका:यांचे नियंत्रण
दुष्काळ निवारणात कसर राहू नये यासाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिका:यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  
 
8क् टीएमसी पाणी मिळणार
कोकण खो:यातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी गोदावरी खो:यात आणण्यासाठी केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे तीन नदीजोड प्रकल्प राबविण्याचा मार्ग खुला झाला असून, यामुळे गोदावरी खो:यात 
8क् दशलक्ष घनमीटर पाणी मिळेल, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
 
आयआयएमचा
निर्णय घेऊ
औरंगाबादते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्याचा निर्णय कधी होणार या  प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत चर्चा चालू असून, लवकरच निर्णय घेऊ, असे सांगत प्रश्न टाळला. 

 

Web Title: Peakkor Vasuli stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.