सोने महिन्याच्या उच्चंकी पातळीवर
By Admin | Updated: June 20, 2014 23:46 IST2014-06-20T23:46:17+5:302014-06-20T23:46:17+5:30
स्थानिक मागणीच्या बळावर शुक्रवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात तेजीचे वारे संचारले. सोन्याचा भाव 605 रुपयांनी, तर चांदीचा भाव 1,800 रुपयांनी वाढला.

सोने महिन्याच्या उच्चंकी पातळीवर
>नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक मागणीच्या बळावर शुक्रवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात तेजीचे वारे संचारले. सोन्याचा भाव 605 रुपयांनी, तर चांदीचा भाव 1,800 रुपयांनी वाढला.
या तेजीमुळे सोन्याचा भाव 28,625 रुपये तोळा झाला आहे. हा एक महिन्याचा उच्चंक आहे. अठराशे रुपयांच्या वाढीसह चांदीचा भाव 44,900 रुपये किलो झाला आहे. चांदीच्या भावाला औद्योगिक क्षेत्रतील मागणीचे मोठे पाठबळ मिळाले. शिक्के निर्मात्यांकडूनही चांदीची मागणी वाढली. अशा दुहेरी बळावर चांदीने मोठी ङोप घेतली.
जागतिक बाजारात आज सोन्याने मोठी ङोप घेतली. सप्टेंबर 2013 नंतर सोने सर्वाधिक उंचीवर पोहोचले आहे. इराकमधील भू-राजकीय संकटानंतर गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा मौल्यवान धातूंकडे वळविला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोने-चांदी महागले आहे. जागतिक बाजारात सोन्याचा आजचा भाव 1322.12 डॉलर प्रति औंस असा राहिला. 12 एप्रिलनंतरचा हा सर्वाधिक उंच स्तर आहे.
तयार चांदीचे भाव 1,800 रुपयांनी वाढल्यानंतर 44,900 रुपये किलो झाले. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचे भाव 1900 रुपयांनी वाढून 44,380 रुपये किलो झाले. चांदीच्या शिक्क्यांचा भाव तब्बल 3000 रुपयांनी वाढून खरेदीसाठी 80,000 रुपये, तर विक्रीसाठी 81,000 रुपये प्रतिशेकडा झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4रुपया कमजोर झाल्याचा फायदाही सोन्याला झाला आहे. रुपयाची घसरण झाल्याने सोन्याची आयात महागते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती आपोआप वाढतात.
4दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के सोन्याचे आजचे भाव 605 रुपयांनी वाढल्यानंतर अनुक्रमे 28,625 रुपये आणि 28,425 रुपये तोळा झाले.
4या आधी 22 मे रोजी सोने या पातळीवर होते. सोन्याच्या गिन्नीचे भाव 300 रुपयांनी वाढले. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,900 रुपये झाला.