शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

शिखर बँक घोटाळा; सीबीआय तपासाला राज्य सरकारचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 07:36 IST

याचिकाकर्ते सुरींदर अरोरा यांनी २०१९ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या आधारावर उच्च न्यायालयाने हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईओडब्ल्यू) कडे वर्ग केला, अशी माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाला दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आरोपी असलेल्या शिखर बँक घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारने सोमवारी आक्षेप घेतला. यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले.

याचिकाकर्ते सुरींदर अरोरा यांनी २०१९ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या आधारावर उच्च न्यायालयाने हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईओडब्ल्यू) कडे वर्ग केला, अशी माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाला दिली. ऑगस्ट २०१९ मध्ये ईओडब्ल्यूने याप्रकरणी गुन्हा नोंदविला आणि तपास केला. ५ सप्टेंबर २०२० रोजी सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. अद्याप सत्र न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेला नाही आणि अरोरा यांनी या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात न्यायालयात निषेध याचिका दाखल केली आहे. अरोरा यांनीच जनहित याचिकेत या घोटाळ्याचा तपास सीबीआय किंवा ईओडब्ल्यूकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार न्यायालयाने हा तपास ईओडब्ल्यूकडे वर्ग केला. त्यामुळे ही याचिका दाखल करून घेण्यायोग्य नाही, असा युक्तिवाद करत कुंभकाेणी यांनी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यास आक्षेप घेतला. न्यायालयाने कुंभकोणी यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देऊन  या याचिकेवरील पुढील सुनावणी २२ मार्च रोजी ठेवली. गेल्या आठवड्यात अरोरा यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेनुसार, ईओडब्ल्यूने  शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७५ जणांना क्लिनचिट दिली आहे. बँकेत कोणताही घोटाळा झाला नाही आणि सर्व कारभार सुरळीत सुरू आहे. त्यामुळे सर्वांना क्लिनचिट देण्यात आली, असे अजित देशमुख यांनी विधान केले. खुद्द देशमुख हे या घोटाळ्यात आरोपी आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. तर कर्ज वाटपात कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अत्यंत घाईघाईने हा अहवाल बनवण्यात आला. दिवाणी स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यामुळे सी-समरी अहवाल सादर करण्याची परवानगी द्यावी, असे पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे.

सी-समरी अहवाल सादर करण्याची परवानगी हवी!nयाचिकेनुसार, ईओडब्ल्ययूने शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७५ जणांना क्लिनचिट दिली आहे. तर कर्ज वाटपात अनियमितता आढळली नसल्याचे पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले. अत्यंत घाईघाईने हा अहवाल बनवला. त्यामुळे सी-समरी अहवाल सादर करण्याची परवानगी द्यावी, असे पोलिसांनी अहवालात नमूद केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार