बँक फसवणूक प्रकरणातील कोतवालाला २४ डिसेंबरपर्यंत पीसीआर
By Admin | Updated: December 22, 2016 19:48 IST2016-12-22T19:48:46+5:302016-12-22T19:48:46+5:30
कोतवाल रामभाऊ हिरामन कांबळे या आरोपीस २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विद्यमान न्यायालयाने गुरुवारी दिले.

बँक फसवणूक प्रकरणातील कोतवालाला २४ डिसेंबरपर्यंत पीसीआर
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 22 - बनावट कागदपत्र सादर करुन तीन लाख रुपयाने कॅनरा बँकेला गंडविणाऱ्या सेवानिवृत्त कोतवाल रामभाऊ हिरामन कांबळे या आरोपीस २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विद्यमान न्यायालयाने गुरूवारी दिले.
भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना ७/१२ वर मिळणाऱ्या पीककर्ज योजनेचा गैरफायदा घेवून बनावट कागदपत्रांव्दारे कॅनरा बँकेची ३ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. स्थानिक कॅनरा बँकेचे शाखाधिकारी संदिप सुरेश ढवस यांच्या फिर्यादीवरून केशव आयाजी सरोदे (रा. किन्ही, ता. मालेगाव) व रामभाऊ हिरामन कांबळे (रा.हनवतखेडा, ता. मालेगाव) या दोघांविरूद्ध १८ डिसेंबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील रामभाऊ कांबळे या आरोपीस १९ डिसेंबरला पोलिसांनी जेरबंद केले होते. सुरूवातीला २२ डिसेंबरपर्यंत आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुरूवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, २४ डिसेंबपर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विद्यमाने न्यायालयाने दिले.
या प्रकरणातील दुसरा आरोपी केशव सरोदे हा अद्याप फरार असून, त्याला जेरबंद करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल जगदाळे यांनी दिली.