शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पवार मोठे नेते, मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा- निरंजन डावखरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 11:41 IST

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेले दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेले दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी निरंजन डावखरे यांनीही राष्ट्रवादीत होत असलेल्या कोंडमा-याला वाट मोकळी करून दिली. स्थानिक नेत्यांकडून काम करताना त्रास होत होता म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पवार हे मोठे नेते आहेत. तरी मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा आहे. मुख्यमंत्री सातत्यानं माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.गेल्या 10 वर्षांपासून मी राजकारणात काम करतोय. मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात मला आणखी चांगलं काम करता येईल, असंही निरंजन डावखरे म्हणाले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही काल राजीनामा दिला. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा काल सुपूर्द केला होता.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठविला होता. दिवंगत वसंत डावखरे यांना मानणारा एक मोठा वर्ग पालघर, ठाणे जिल्ह्यात आहे. तो भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाला ठाणे पट्ट्यात एक तरुण चेहरा लाभणार असल्याने भाजपा नेतेही डावखरेंच्या पक्षप्रवेशासाठी सकारात्मक आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवे