रस्तारुंदीकरणासाठी सहकार्य करावे : पवार

By Admin | Updated: September 22, 2016 02:14 IST2016-09-22T02:14:07+5:302016-09-22T02:14:07+5:30

ढेकळवाडी ते काटेवाडी रस्तारुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे

Pawar should help in road construction: Pawar | रस्तारुंदीकरणासाठी सहकार्य करावे : पवार

रस्तारुंदीकरणासाठी सहकार्य करावे : पवार


काटेवाडी : ढेकळवाडी ते काटेवाडी रस्तारुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे; तसेच ढेकळवाडी ते भवानीनगर (३५ फाटा) हा रस्ता न्यायप्रविष्ट असल्याने या रस्त्याबाबत चर्चेने मार्ग काढावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
ढेकळवाडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. लागेल तो निधी या रस्त्यासाठी
देईन, अशी ग्वाही पवार यांनी दिली. या वेळी राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सरंपच शिवाजी लकडे यांनी स्वागत केले. तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल गावातील तुषार बोरकर या युवकाचा सत्कार पवार यांनी केला.
या वेळी सभापती करण खलाटे, जिल्हा परिषद सदस्य, विश्वास देवकाते, ‘छत्रपती’चे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, नगराध्यक्ष
योगेश जगताप, कुंदन देवकाते, नारायण कोळेकर, संभाजी
होळकर, एकनाथ काटे, रामचंद्र बलंवड, प्रतिभा नेवसे, श्यामराव चोपडे, दिलीप घुले,
ग्रामविकास अधिकारी सुभाष चौधर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pawar should help in road construction: Pawar