पवारांनी काँग्रेसवर फोडले खापर!

By Admin | Updated: June 26, 2014 01:01 IST2014-06-26T01:01:03+5:302014-06-26T01:01:03+5:30

महागाई व भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला, अशा शब्दांत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचे खापर आज काँग्रेसवर फोडले.

Pawar scuttled Congress! | पवारांनी काँग्रेसवर फोडले खापर!

पवारांनी काँग्रेसवर फोडले खापर!

>मुंबई : लोकसभेत काँग्रेसविरोधी लाटेचा फटका आम्हालाही बसला. महागाई व भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला, अशा शब्दांत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचे खापर आज काँग्रेसवर फोडले. 
राष्ट्रवादीच्या विस्तारित प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, केंद्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध काही गांधीवादी नेते उपोषणाला बसले असताना काँग्रेसला भ्रष्टाचाराचे आरोप खोडता आले नाहीत. काँग्रेस नेते व शरद पवारांच्या नेतृत्वाविषयी  मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री जाणार असे म्हटले जात आहे. आम्हाला काय राहायचे असेल तर राहा नाही तर जा. तुमचे नेतृत्व करायला पवारांना वेळ आहे कुठे, असा सवाल केला.  
जागावाटपाची चर्चा सन्मानजनक असली पाहिजे. आपली ताकद सर्व जिल्ह्यांत आहे, याची काळजी वाटाघाटी करणा:यांनी घेतली पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
 
 
 

Web Title: Pawar scuttled Congress!