पावणेदोन किलो सोने साईचरणी
By Admin | Updated: January 1, 2017 01:12 IST2017-01-01T01:12:49+5:302017-01-01T01:12:49+5:30
साईबाबांना शनिवारी सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी जवळपास पावणेदोन किलो सोन्याच्या दोन वस्तूंचे दान आले़ त्याची किंमत जवळपास ५३ लाख रुपये आहे़ एका भाविकाने

पावणेदोन किलो सोने साईचरणी
शिर्डी : साईबाबांना शनिवारी सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी जवळपास पावणेदोन किलो सोन्याच्या दोन वस्तूंचे दान आले़ त्याची किंमत जवळपास ५३ लाख रुपये आहे़ एका भाविकाने दिलेल्या देणगीतून उभारलेल्या अतिदक्षता विभागाचा समर्पण सोहळाही शनिवारी झाला़
छत्तीसगढ येथील एका भाविकाने शनिवारी एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट बाबांना अर्पण केले़ तर पादुका ठेवण्यासाठी मंगेश व सुरेखा रणमाळे (वैद्य) या दाम्पत्याने अर्धा किलो ४६ ग्रॅमचा सुवर्ण चौरंग दान केला. त्याची किंमत जवळपास अठरा लाख आहे़ नेदरलँड येथील व्यावसायिक व बंगळुरूचे रहिवासी सुधीर प्रभू यांच्या एक कोटीच्या देणगीतून उभारलेल्या सर्जिकल आयसीयू युनिटचे उद्घाटन करण्यात आले़ (प्रतिनिधी)