जव्हारमधील शाळेत पाटी पूजन
By Admin | Updated: October 11, 2016 18:06 IST2016-10-11T18:06:56+5:302016-10-11T18:06:56+5:30
जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांत आजही पाटी पूजन (सरस्वती पूजन) मोठ्या उत्साहात करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी विद्यार्थी शाळेच्या आवारात

जव्हारमधील शाळेत पाटी पूजन
>ऑनलाइन लोकमत
जव्हार, दि. 11 - जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांत आजही पाटी पूजन (सरस्वती पूजन) मोठ्या उत्साहात करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी विद्यार्थी शाळेच्या आवारात बसवून पाटीवर पेन्सील, पेन, फुले अगरबत्ती वाहून सरस्वती देवीचे शस्त्र म्हणून पाटीचे पूजन करतात. ही अनेक वर्षांपासून सुरु असलेली पारंपारिक प्रथा आजही खोडोपाड्यातील जिल्हा परीषद शाळांत दिसून येते.
जव्हार तालुक्यातील हिरडपाडा या आश्रमशाळेतील मुलांनी आपल्या शाळेच्या बाहेर शिक्षकांसोबत पाटीला सजवून पूजा केली.