शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

‘सनबर्न’चा मार्ग अखेर मोकळा , जनहित याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:38 IST

सनबर्न या संगीत कार्यक्रमामध्ये दारू, सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. मात्र, किशोरवयीन मुलामुलींना मद्यपान करू न देण्याचा व शासनाने घातलेल्या सर्व अटीशर्तींचे पालन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने ‘सनबर्न’चे आयोजक परसेप्ट लाइव्ह प्रा. लि.ला दिला आहे.

मुंबई : सनबर्न या संगीत कार्यक्रमामध्ये दारू, सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. मात्र, किशोरवयीन मुलामुलींना मद्यपान करू न देण्याचा व शासनाने घातलेल्या सर्व अटीशर्तींचे पालन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने ‘सनबर्न’चे आयोजक परसेप्ट लाइव्ह प्रा. लि.ला दिला आहे.२१ वर्षांखालील मुलामुलींना मद्यपान करण्याची परवानगी देणार नाही, असे आश्वासन आयोजकांनी दिल्यानंतर न्या. शंतनू केमकर व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने ‘सनबर्न’ला हिरवा कंदील दाखवला. मात्र, अद्यापही ‘सनबर्न’ला राज्य सरकारकडून आवश्यक परवानगी मिळालेली नाही.१५ वर्षांवरील मुलामुलींना कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी असल्याने ही किशोरवयीन मुले-मुली कार्यक्रमादरम्यान मद्यपान करण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही, असे रतन लुथ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे.किशोरवयीन मुले मद्यपान करणार नाहीत, याची खबरदारी कशा प्रकारे घेण्यात येईल, अशी विचारणा गेल्या सुनावणीत न्यायालयाने आयोजक व सरकारकडे केली होती. त्यावर सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. कार्यक्रमादरम्यान पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. किशोरवयीन मुलांना लाल रंगाचा बँड देण्यात येईल, आदी माहिती सरकारने प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तर आयोजकांनीही कोणतेही बेकायदा कृत्य या कार्यक्रमादरम्यान घडणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. २८ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम सुरू होईल.‘तुमचे बाऊन्सर पोलिसांपेक्षा जास्त ताकदवान होऊ देऊ नका,’ असे न्यायालयाने आयोजकांना टोला लगावत म्हटले. तर राज्य सरकारला चार दिवस पोलिसांची कामाची पाळी बदलण्याचीही सूचनाही केली....तर कारवाईगेल्या वर्षीचे सर्व थकीत सरकारकडे जमा करा आणि किशोरवयीन मुले मद्य, सिगारेटचे सेवन करणार नाहीत, याची काळजी घ्या. सरकारच्या सर्व अटीशर्तींचे पालन करा. तसे न झाल्यास अवमानाची कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.राज्य सरकारकडून परवानगी नाही२१ वर्षांखालील मुलामुलींना मद्यपान करण्याची परवानगी देणार नाही, असे आश्वासन आयोजकांनी दिल्यानंतर न्यायालयाने ‘सनबर्न’ कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवला. मात्र, अद्यापही ‘सनबर्न’ला राज्य सरकारकडून आवश्यक परवानगी मिळालेली नाही.

टॅग्स :Sunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हलPuneपुणे