शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणाचा मार्ग खडतर,  आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:00 IST

मराठा समाजासाठी आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या धनगरांच्या आरक्षणाच्या आशाही उंचावल्या आहेत. मात्र धनगरांच्या आरक्षणाचा मार्ग खडतर असल्याचे समोर आले आहे.

मुंबई - मराठा समालाजाचा एसइबीसी या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर इतर जातीय समुहांच्याही आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या धनगरांच्या आरक्षणाच्या आशाही उंचावल्या आहेत. मात्र धनगरांच्या आरक्षणाचा मार्ग खडतर असल्याचे समोर आले आहे. धनगरांना आरक्षण देण्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाचा अहवाल नकारात्मक आल्याने धनगरांना आरक्षण मिळण्याचा मार्ग बिकट झाला आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक आल्याने राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग अवघड झाला आहे. बॉम्बे रजिस्ट्रेशन अॅक्टमध्ये धनगरऐवजी धनगड असा उल्लेख झाला असल्याने धनगरांना आरक्षण मिळत नसल्याचा आक्षेप घेतला जात होता. मात्र  धनगर आणि धनगड हे वेगवेगळे असून, धनगड ही वेगळी जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. धनगड हेच खरे आदिवासी आहेत. त्यामुळे धनगडांच्या आरक्षणासाठी धनगर पात्र नाहीत, असा दावा या अहवालातून करण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागात असलेल्या धनगर समाजातील पोटजातींच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये धनगरांपैकी काही जाती मागास असल्याचे समोर आले आहे. मात्र काही जातींकडे नोकरी, घर, जमीन असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtraमहाराष्ट्र