ताकई फाटा ते ताकई रस्त्यावर खड्डे

By Admin | Updated: October 20, 2016 03:21 IST2016-10-20T03:21:52+5:302016-10-20T03:21:52+5:30

खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले

Patchwork on the rugged tracks | ताकई फाटा ते ताकई रस्त्यावर खड्डे

ताकई फाटा ते ताकई रस्त्यावर खड्डे


वावोशी : खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले, परंतु काही दिवसातच रस्त्यावर खड्डे पडल्याने याबाबतची तक्र ार नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने तीन महिन्यांतच ९० लाख खर्च करून बनविलेल्या ताकई रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तर अनेक अपघाताची मालिका सुरू आहे, त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांनी आक्र मक भूमिका घेतली आहे. मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांची काही तरु णांनी भेट घेऊन रस्त्याची लवकर दुरु स्ती करण्याची मागणी के ली आहे.
संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करून, त्यांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांच्याकडे यापूर्वी करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्यावेळी ताकई येथील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे भरणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता नगराध्यक्ष मसूरकर यांनी आम्ही आयआरबीशी चर्चा करून त्यांच्याकडील सिमेंट मटेरियल घेणार असून त्यानुसार शहरात पडलेले सर्व खड्डे यातून भरण्यात येणार आहेत, याची सुरुवात ताकई रस्त्यापासून करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानुसार फसवाफसवीचा खेळ खेळत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले, परंतु खड्डे बुजलेच नाहीत. त्यामुळे पुन्हा नगर पालिका शिक्षण मंडळाचे सभापती जयवंत पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अतुल पाटील, डॉ.हेमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील आदींसह तरुणांनी मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांची भेट घेतली. आचारसंहिता लागू झाल्याने काँक्र ीटीकरण होईल का? पुन्हा खड्ड्यांचा सामना करावा लागेल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
>रस्ता दुरु स्तीचे आश्वासन
रस्त्याचे काम कधी करणार असे विचारले असता रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश अभियंता जाधव यांना दिले असून आपल्या हद्दीतील रस्त्यावर खड्डे परिसरामधील कारखान्यातील अवजड वाहनांमुळे होत असल्याने त्यांच्याशी चर्चा करून काही मदत मिळते का ते बघू तसेच काँक्र ीटीकरणासाठी प्रस्ताव पाठविला असून येत्या तीन महिन्यात रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काँक्र ीटीकरण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

Web Title: Patchwork on the rugged tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.