पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’

By Admin | Updated: April 16, 2016 02:23 IST2016-04-16T02:23:39+5:302016-04-16T02:23:39+5:30

माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरमध्ये किरकोळ बिघाड झाल्याने ते अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे सकाळी ११

Patangrao Kadam's helicopter 'Emergency landing' | पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’

पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’

जामखेड (अहमदनगर) : माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरमध्ये किरकोळ बिघाड झाल्याने ते अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे सकाळी ११ वाजता तातडीने उतरावे लागले. पायलटने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.
पतंगराव कदम हे त्यांचा मुलगा प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित यांच्यासमवेत जालना येथे दिवंगत माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या धार्मिक विधीला गेले होते. तेथे माजी मंत्री राजेश टोपे यांना भेटून जालना येथून अकलूज येथे दिवंगत उदयसिंह मोहिते कुटुंबाच्या भेटीसाठी निघाले होते. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला़ पायलटने प्रसंगावधान राखून तातडीने खाली उतरविले. (प्रतिनिधी)

Web Title: Patangrao Kadam's helicopter 'Emergency landing'