घाटकोपरमध्ये लवकरच सुरू होणार पासपोर्ट ऑफिस
By Admin | Updated: February 28, 2017 13:38 IST2017-02-28T13:38:34+5:302017-02-28T13:38:34+5:30
मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणा-यांसाठी एक खूशखबर बातमी आहे.

घाटकोपरमध्ये लवकरच सुरू होणार पासपोर्ट ऑफिस
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणा-यांसाठी एक खूशखबर बातमी आहे. घाटकोपरमध्ये राहणा-यांना पासपोर्ट बनवण्यासाठी आता दुस-या ठिकाणी जाऊन धावाधाव करण्याची गरज नाही. कारण आता घाटकोपरमध्ये लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमध्ये एक पासपोर्ट सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पोस्ट ऑफिस असेल अशा ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रासाठी जागा शोधण्यात येईल. तसंच यासंदर्भातील औपचारिकताही लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
ब-याच कालावधीपासून घाटकोपरमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात होती. यासाठी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनीही सुषमा स्वराज यांच्याकडे विनंती केली होती. सोमय्या यांची विनंती स्वीकारुन सुषमा स्वराज यांनी त्यांना सोमवारी पत्र पाठवले.
या पत्रात त्यांनी पासपोर्ट केंद्राचे उद्घाटन करण्यासंदर्भातही उल्लेख केला आहे. दरम्यान, पासपोर्ट सेवा केंद्र कधीपर्यंत सुरू होणार याची माहिती औपचारिकता पूर्ण केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.