प्रवाशांच्या बॅगा चाेरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:55 IST2017-07-22T00:55:14+5:302017-07-22T00:55:14+5:30
सेवाग्राम एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या बॅग चाेरणाऱ्या ६५ वर्षाच्या वृद्धास रेल्वे पाेलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. यावेळी वृद्धापासून दाेन बॅग जप्त करण्यात आल्या.

प्रवाशांच्या बॅगा चाेरणाऱ्यास अटक
ऑनलाइन लोकमत
अकाेला, दि. 22 - सेवाग्राम एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या बॅगा चाेरणाऱ्या ६५ वर्षाच्या वृद्धास रेल्वे पाेलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. यावेळी वृद्धापासून दाेन बॅग जप्त करण्यात आल्या.
नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेसचे गुरुवारी रात्री १.२० वाजता अकाेला रेल्वे स्थानकावर अागमन झाल्यानंतर गाडीच्या एस-७ डब्ब्यातून एक वृद्ध व्यक्ती खाली उतरला. संबंधित वृद्धाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या पाेलिसांनी त्याची विचारणा करून त्याच्या जवळील दाेन बॅगांची माहिती विचारली. परंतु बॅगांसंदर्भात वृद्धाने याेग्य उत्तर न दिल्याने पाेलिसांनी एस-७ व एस-८ डब्ब्यातील प्रवाशांना त्यांच्या बॅगांची पाहणी करण्याचे सांगितले. यावेळी मुंबई येथील धारावीमध्ये राहणारे सबरे आलम अंसारी नईम अंसारी आणि रवि पिठलवार (अारमाेर, गडचिराेली) यांनी त्यांच्या बॅगा डब्ब्यात नसल्याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी त्यांना वृद्धाजवळ असलेल्या बॅग दाखवल्यानंतर त्यांनी संबंधित बॅग अापल्याच असल्याची माहिती संबंधितांना दिली. त्यामुळे रेल्वेतून उतरणारा वृद्ध हा बॅग चाेर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्या विराेधात जीआरपी पाेलीस ठाण्यात कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जीआरपी पाेलीस करत आहेत.