सिग्नल बिघडल्यामुळे प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: April 11, 2015 05:45 IST2015-04-11T05:45:57+5:302015-04-11T05:45:57+5:30
उपनगरीय रेल्वेमार्गावर बिघाडाची परंपरा सुरूच असून, यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वेमार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वे

सिग्नल बिघडल्यामुळे प्रवाशांचे हाल
मुंबई : उपनगरीय रेल्वेमार्गावर बिघाडाची परंपरा सुरूच असून, यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वेमार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वेमार्गावर सिग्नलमध्ये बिघाड झाला; आणि या बिघाडांनी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या दोन्ही मार्गांवरील लोकल २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अंधेरी ते जोगेश्वरीदरम्यान अप धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल केले. बिघाडाची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळविण्यात आल्या. मात्र त्याचा फटका अधिकच बसत गेल्याने लोकल २० मिनिटे उशिराने धावू लागल्या. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली. अनेक प्रवासी लोकलची प्रतीक्षा करताना दिसत होते. सिग्नल यंत्रणेतील बिघाड अर्धा तासात दुरुस्त करण्यात आल्यानंतर अप धीमा मार्ग पूर्ववत करण्यात आला. मात्र या बिघाडामुळे दुपारपर्यंत पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीतच राहिले. (प्रतिनिधी)