पक्ष पाठिशी आहे, चौकशीतून सत्य बाहेर येईल - एकनाथ खडसे
By Admin | Updated: June 6, 2016 17:45 IST2016-06-06T17:42:43+5:302016-06-06T17:45:14+5:30
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून काही ठिकाणी जाळपोळ व रास्ता

पक्ष पाठिशी आहे, चौकशीतून सत्य बाहेर येईल - एकनाथ खडसे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून काही ठिकाणी जाळपोळ व रास्ता रोकोच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी बोलताना एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन सोमवारी केले आहे.
पक्ष माझ्या पाठिशी आहे, चौकशीतून सत्य सर्वांसमोर येईलच. माझ्यासाठी नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज नाही आहे. तसेच, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी यावेळी केले.
एकनाथ खडसे यांच्यावर एकामागून एक आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.