शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

मला पक्ष महत्त्वाचा आहे, नारायण राणेंवर बोलण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:16 AM

नारायण राणे अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. ते पक्षात राहिले पाहिजेत अशीआमची इच्छा आहे. पण पक्षांतर्गत विषयांवर जे काही बोलायचे ते त्यांनी पक्षात बोलावे, मी बाहेर जाहीरपणे काहीही बोलणार नाही, माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.

अतुल कुलकर्णी मुंबई : नारायण राणे अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. ते पक्षात राहिले पाहिजेत अशीआमची इच्छा आहे. पण पक्षांतर्गत विषयांवर जे काही बोलायचे ते त्यांनी पक्षात बोलावे, मी बाहेर जाहीरपणे काहीही बोलणार नाही, माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.राणे यांनी कुडाळमध्ये खा. चव्हाण यांच्यावर तीव्र टीका केली. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, पक्षात कोणी काय केले, पक्ष कोणी किती वाढवला, नांदेडमध्ये किती आणि अन्य जिल्ह्यात किती याचे मुल्यमापन लोक करत असतात. आकडेवारी समोर आहे. पण मला राणे यांच्याविषयी काहीही बोलायचे नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत. कसे वागावे, बोलावे हे त्यांनी ठरवावे. मी पक्ष कार्यालयात कोणत्याही विषयावर, कधीही बोलायला, भेटायला तयार आहे. पण पक्षातील मतभेद, विचार जाहीर व्यासपीठावर बोलण्याची काँग्रेसची परंपरा नाही. मला माझा पक्ष सांभाळायचा आहे, असेही चव्हाण म्हणाले.तुम्ही रत्नागिरीत जिल्हाध्यक्ष चार वर्षे नेमला नाही आणि सिंधुदर्गात मात्र आहे तो बदलला, असा राणेंचा आक्षेप आहे. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, पक्षाअंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया राज्यभर चालू आहे. त्यामुळे त्यावर मी काहीही भाष्य करणार नाही. कोण कुठे काय करतो याच्या व्हिडीओ क्लीप सगळीकडे फिरत असतात. त्यावर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी शांत कसा बसणार, असे ते म्हणाले.>शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे पावसात गेले वाहूनशिवसेनेने आमदारांशी थेट चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्याची घोषणा केलीय. सेनेने आॅफर दिल्यास आपण शिवसेना, राष्टÑवादी असे सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे हे खरे आहे का? असे विचारले असता खा. चव्हाण म्हणाले, अशी कोणतीही बोलणी झालेली नाही. मध्यंतरी याच शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. ते कदाचित परवा झालेल्या मुंबईतल्या मुसळधार पावसात वाहून गेले असतील. त्यामुळे ते असे बोलले असतील. सेनेच्या कोणत्याही भूमिकेवर विश्वास राहीलेला नाही. शिवसेना सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर काय सांगणार? असेही ते म्हणाले.