शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 16:23 IST

कालपर्यंत कोणी कोणत्या विचारधारेवर काम करत असेल तर ते माहिती नाही. परंतु आमच्या पक्षात आल्यानंतर विचारधारेवर काम करावे लागते असं बावनकुळे म्हणाले.

दिल्ली - भाजपाच्या प्रत्येक बूथवर २५ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम घेतोय. ३० एप्रिलच्या मन की बातपर्यंत राज्यातील २५ लाखाच्यावर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. हा संपूर्ण महिना पक्षप्रवेशाचा आहे. बूथ सशक्तीकरण अभियनाचा आहे. सर्व बूथवर आमचा प्रवास सुरू आहे असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे. पत्रकारांनी अजित पवार भाजपात प्रवेश करणार का असा प्रश्न बावनकुळेंना विचारला होता. 

चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांना बावनकुळे म्हणाले की, १ लाख बूथवर आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. राज्यातील ७०० पदाधिकारी बूथवर जात आहेत. आम्ही २५ लाख बूथ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करणार आहे. मोठ्या पक्षप्रवेशाबाबत मी बोलणार नाही. परंतु पक्षात कोणीही आले तरी त्यांना स्थान आहे. भाजपाची विचारधारा ज्यांना मान्य आहे त्यांनी पक्षात प्रवेश केला तर त्याला कुणाची हरकत नाही असं त्यांनी सांगितले आहे. 

तसेच भाजपात विचारधारेचा मुद्दा आहे. आमचे पहिले कर्तव्य देशासाठी तडजोड नाही. देव, देश, धर्म, संस्कृती यासाठी आम्ही काम करतो. कालपर्यंत कोणी कोणत्या विचारधारेवर काम करत असेल तर ते माहिती नाही. परंतु आमच्या पक्षात आल्यानंतर विचारधारेवर काम करावे लागते. आमच्या पक्षात कुणी आले तरी विचारधारेशी सहमत झाला तर आमची कुणाची हरकत नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

दिल्ली दौरा प्रशासकीय कामासाठीमी प्रशासकीय कामासाठी दिल्ली दौऱ्यावर आलोय, तर आशिष शेलार मुंबई-दिल्ली-बंगळुरू असा प्रवास करतायेत. त्यामुळे राजकीय दौरा नाही. अमित शाह यांना भेटायला गेलो तर राजकीय कारण असायला हवे असं नाही. दिल्लीत असल्यावर अमित शाह यांना भेटायला फोन केला ते म्हणाले या तर भेटायला जातो. आज राजकीय बैठक नाही असा खुलासा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

अजित पवारांबद्दल माहिती नाहीअजित पवारांबद्दल मला काही माहिती नाही. अजितदादांच्या भूमिकेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. राजकारणात चर्चा खूप होतात, पण जर-तर याला अर्थ नसतो. अजित पवारांनी भाषण का दिले नाही हे मविआने ठरवावे असंही बावनकुळे म्हणाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा