भाजपा गुंडांचा पक्ष - नारायण राणे

By Admin | Updated: October 23, 2016 23:00 IST2016-10-23T23:00:59+5:302016-10-23T23:00:59+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सेल उघडला आहे त्यामध्ये खून, दरोडे टाकणा-यांना दररोज बोलावून प्रवेश दिला जात असून, भ्रष्टाचार आणि भयमुक्त आश्वासन देणारा भाजपा हा पक्ष गुंडांचा पक्ष

Party of BJP goons - Narayan Rane | भाजपा गुंडांचा पक्ष - नारायण राणे

भाजपा गुंडांचा पक्ष - नारायण राणे

dir="ltr">
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 23  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सेल उघडला आहे त्यामध्ये खून, दरोडे टाकणा-यांना दररोज बोलावून प्रवेश दिला जात असून,  भ्रष्टाचार आणि भयमुक्त आश्वासन देणारा भाजपा हा पक्ष गुंडांचा पक्ष बनू लागला आहे. त्यांच्याकडून काय भ्रष्टाचार आणि भयमुक्त शहराची अपेक्षा करायची. शाहू-फुलेंचा महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. 
पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने दापोडीत आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष सचिन साठे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, सचिव भाऊसाहेब भोईर, महिलाध्यक्षा ज्योती भारती, विरोधी पक्षनेते राहुल भोसले, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णू नेवाळे आदी उपस्थित होते. 
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर राणे यांनी जोरदार टीका केली. राणे म्हणाले, ‘‘आश्वासनांचा पाऊस पाडणा-या भाजपाचा पंचनामा करायला मी येथे आलो आहे. शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार अशा सर्वच घटकांतील नागरिक बेजार झाले आहेत. कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? कोठे गेले अच्छे दिन? दोन वर्षांत काय दिवे लावले आता पुढील तीन वर्षांत लावाल. डिजिटल महाराष्ट्र करण्याचे स्वप्न दाखविणा-या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एकाही गावासाठी एकही संगणक खरेदी केला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये एकतरी काम दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा. थापा मारणारा मुख्यमंत्री आहे. शासनाच्या वेतनावर मुख्यमंत्री कार्यालयातही आरएसएसची माणसे काम करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक सेल उघडला आहे. पुण्याचे पालकमंत्री बापट, काकडे-वाकडे त्या गुंडांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. पालकमंत्री नव्हेत, ते डाळमंत्री आता गुंडांना पक्षात घेत आहेत. गुुन्हेगारांना प्रवेश दिल्याने दानवेंची दाणादाण उडाली आहे.
 
स्मार्ट सिटीतही डावलले-
स्मार्ट सिटी योजनेत पिंपरीला डावलले. त्यातही राजकारण केले. दोन वर्षांत राज्याचे वाटोळे झाले आहे. उर्वरित तीन वर्षांत हा महाराष्टÑ दहा वर्षांनी मागे गेल्याशिवाय राहणार नाही, अशीही टीका राणे यांनी केली.
 
मराठा आरक्षणाबाबत चेष्टा करू नये-
राणे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाबाबत कार्यालयात एक, बाहेर आणि पत्रकार परिषदेत एक बोलत आहेत. आजवर इतर समाजाने आरक्षणासाठी मागणी केली, मोर्चे काढले; त्या वेळी मराठा समाजाने कधीही प्रतिमोर्चा काढलेला नव्हता. मात्र, प्रतिमोर्चे निघत आहेत. दि. १४ नोव्हेंबर २०१४ नंतर १८ महिन्यांत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, हे काय दर्शविते? मराठा किंवा मुस्लिम समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणास धक्का लागू नये, अशी आमची भूमिका आहे. आरक्षणाबाबत भावना ओळखून चेष्टा करू नये.’’
 
३२ प्रभांगाची तयारी करा-
हर्षवर्धन पाटील यांनी सत्ताधारी राष्टÑवादीवर टीका केली. पाटील म्हणाले, ‘‘विविध पुलांचे, बीआरटी रस्त्याचे उद्घाटन करून श्रेय घेतले जात आहे. जेएनयूआरएमचा निधी कोणी आणला होता. काँग्रेसची साथ रुचत नसणारेच आघाडीची भाषा करीत आहेत. विधान परिषदेसाठी पाच-एक अशी चर्चा होत आहे. त्याऐवजी तीन-तीन जागा अशी बोलणी व्हायला हवीत. महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभागांची तयारी करा. ‘एकला चलो’चा नारा देण्याची गरज आहे. सत्तेसाठी सतत पक्ष बदलणारे येथील स्वार्थी आमदार जिथे सत्ता तिथे असू अशी त्यांची भूमिका आहे. सत्ता आल्यास महिनाभरात बांधकामे नियमित करू, असे सांगितले होते. दोन वर्षे झाली; कुठे गेले आश्वासन? मुख्यमंत्र्यांनी केवळ क्लिन चीट देण्यापलीकडे काहीही काम केलेले नाही. पक्षातील वादविवाद, गट-तट सोडून काम करायला हवे.’’  

Web Title: Party of BJP goons - Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.