शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 21:44 IST

Aurangabad Lockdown : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय. शनिवार आणि रविवारी १०० टक्के लॉकडाऊन

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता घेण्यात आला निर्णय शनिवार, रविवारी १०० टक्के लॉकडाऊन

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या ११ मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. औरंगाबादमधील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा याकाळात बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच या कालावधीमध्ये आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असलं तरी या कालावधीत वैद्यकीय सेवा, माध्यमांची कार्यालये, दुध विक्री, भाजीपाला आणि फळविक्री सुरू ठेवण्यात येणार आहे. "गर्दी टाळता येईल आणि अनावश्यक गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगानं वाढतोय त्याला आळा घालता येईल अशा प्रकारचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. संपूर्ण शहरात मास्कचा वापर केला गेला पाहिजे, सुरक्षित अंतरही ठेवलं पाहिजे या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात आलं आहे. सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे," असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. "नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला तरच जे काही शासन, स्थानिक प्रशासन उपाययोजना करत आहे त्याचा परिणाम दिसून येईल. आज मंत्रिमंडळातही कोरोनावर सादरीकरण झालं. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. तसंच अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, सर्वांनी मास्क वापरलं पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवलं पाहिज अशा सूचनाही त्यांनी केल्या. शासन आणि स्थानिक प्रशासनानंदेखील याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. परंतु नागरिकांचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू नये अशी चिंतादेखील बैठकीत व्यक्त करण्यात आली," असंही त्यांनी नमूद केलं.शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाऊन

औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. तसंच या कालावधीत विवाह सोहळे रद्द करण्याचे आदेश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. दर शनिवारी आणि रविवारी आवश्यक सेवा वगळता १०० टक्के लॉकडाऊन असणार आहे. याव्यतिरिक्त जाधवमंडी बुधवार पासून बंद राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे