शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By अतुल कुलकर्णी | Updated: November 8, 2025 12:15 IST

"५००च्या स्टॅम्पवर कुठे अशा नोंदी होतात का?"

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुण्याचे जमीन विक्रीचे जे प्रकरण समोर आले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. पाचशे रुपयात अशा कुठे नोंदी होतात का? सरकारमध्ये काही नियम आहेत की नाही? सत्तेचा दुरुपयोग किती करावा? असे रोखठोक सवाल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले. या प्रकरणाची फाइल आपल्याकडे आली होती, मात्र आपण ती नाकारल्याचेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात आले आहे. याविषयी महसूल मंत्री असताना तुमच्या काळात काय घडले होते? असा सवाल केला असता थोरात म्हणाले, या विषयाची फाइल माझ्याकडे तीन वेळा आली होती. तिन्ही वेळा मी ही फाइल नाकारली होती. नंतर संबंधित लोक उच्च न्यायालयातही गेले. उच्च न्यायालयानेही हे प्रकरण नाकारले होते. पुन्हा हे प्रकरण आपल्यासमोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो, हे आपल्यापासून लपवून ठेवले होते. मात्र, तपशिलात गेल्यानंतर ते समोर आले. अर्धन्यायिक आणि प्रशासकीय दोन्ही पातळीवर या विषयाची फाइल मी नाकारली होती. नंतरच्या काळात ही फाइल ज्या महसूल मंत्र्यांकडे गेली, त्यांनी कुठलाही निर्णय न देता ती फाइल तशीच ठेवल्याची आपली माहिती असल्याचे थोरात म्हणाले.

जे काही झाले, ते पूर्णपणे चुकीचे

सामान्य माणसाने कायदेशीररित्या नोंदणी करायची किंवा केलेली नोंदणी रद्द करायची ठरवली तर त्याला अनेक चकरा माराव्या लागतात. या प्रकरणात सगळ्याच गोष्टी इतक्या पटापट कशा झाल्या? असे विचारले असता थोरात म्हणाले, याचे उत्तर ज्यांनी कोणी या प्रकरणात दबाव आणला तेच देऊ शकतील.

दुर्दैवाने आपल्याकडे सर्वसामान्यांसाठी एक आणि प्रभावी नेत्यांसाठी एक अशी वागणूक मिळते. उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव यात आल्यामुळे यंत्रणा कशी गतीने हलते, हे सामान्य माणूसही सांगू शकतो. या प्रकरणात जे काही झाले आहे ते पूर्णपणे चुकीचे झाले आहे. अगदी निर्णय रद्द करण्याची घाईदेखील, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

बारामतीतही जमिनी बळकावल्याचा बसपचा आरोप

बसपाचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महार वतनाच्या जमिनी त्यांच्या हस्तकांच्या नावे बळकावल्याचा आरोप केला. यामध्ये बऱ्याच महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग असून याबाबत चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी पत्र पाठविल्याचे सांगितले. 

पार्थ पवार यांच्या कंपनीमार्फत झालेला जमीन व्यवहार पूर्णत: बेकायदेशीर आहे. हा घोटाळा एक लाख कोटींपेक्षा अधिक आहे. मी लोकलेखा समितीवर असताना या प्रकरणाचे अनेक पुरावे हाती आले. त्यामुळे पुण्यात लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा भंडाफोड करणार.- विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते

पुण्यातील कथीत जमीन खरेदी प्रकरणात प्राथमिक चौकशीत संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत; परंतु पार्थ पवार यांचा यात समावेश नाही. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊ द्यावी. त्यानंतर नेमके सत्य समोर येईल.  समिती एक महिन्यात अहवाल देईल, त्यानंतर अंतिम कारवाई होईल.- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Land deal file rejected thrice: Ex-Revenue Minister Thorat speaks out.

Web Summary : Ex-Revenue Minister Balasaheb Thorat revealed he rejected a Pune land deal file thrice. He questioned the legality of the deal, hinting at misuse of power. Allegations involve Deputy CM's son. An investigation is underway.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAjit Pawarअजित पवार