शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ, आदित्य ठाकरेंच्या 'त्या' फोटोंवरून शिवसेना-राष्ट्रवादीत सोशल 'वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 17:41 IST

शिवसेनेकडून पार्थ पवार यांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. महाराष्ट्रातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. या टप्प्यात १७ मतदार संघात मतदान होणार असून मावळ मतदार संघाचा देखील यामध्ये समावेश आहे. मावळमधून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे पार्थ यांच्यासमोर आव्हान आहे. मात्र ही लढत सोशल मीडियावर एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आली आहे.

शिवसेनेकडून पार्थ पवार यांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांचे काही फोटो शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील सोशल वॉर विकोपाला जात असल्याचे असल्याचे चित्र आहे. यातून पार्थ आणि आदित्य ठाकरे यांची प्रतिमा खराब करण्याचा उठाठेव सुरू आहे.

दरम्यान पार्थ पवार तरुण उमेदवार असून परदेशात शिकलेले आहेत. त्यामुळे मैत्रिणी असणे किंवा पबमध्ये फोटो काढणे ही सामान्य बाब आहे. अगदी हेच आदित्य ठाकरे यांना देखील लागू होते. आदित्य ठाकरे यांचे देखील बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत फोटो आहेत. मात्र दोन्ही युवा नेत्यांचे जुने फोटो बाहेर काढून उभय पक्षांकडून निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात करण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा जसजसा जवळ येत आहे, तसतसा निवडणूक प्रचाराचा स्तर घसरत चालल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparth pawarपार्थ पवारAditya Thackreyआदित्य ठाकरेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल