शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड : कृषी सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; २३ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:34 IST

शालेय प्रकालांतर्गत कृषी पर्यटनासाठी गेलेल्या शालेय सहलीत ट्रॅक्टर मधून फेरफटका मारताना ट्रॉली पलटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे २३मुले जखमी झाली आहेत. त्यातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे तर अन्य किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे   

ठळक मुद्देदोघे विद्यार्थी गंभीर; पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली दगड आल्याने घडली दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी-चिंचवड (वाकड) : शालेय प्रकालांतर्गत कृषी पर्यटनासाठी गेलेल्या शालेय सहलीत ट्रॅक्टर मधून फेरफटका मारताना ट्रॉली पलटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे २३मुले जखमी झाली आहेत. त्यातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे तर अन्य किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे   वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कुलची ही सहल शुक्रवारी सकाळी गेली होती सहलीत हा अपघात घडला असून, दोघा विद्यार्थ्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू अ सून  इतर २१ जणांवर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार करून ते किरकोळ जखमी असल्याने त्यांना सोडण्यात आले अपघाताची माहिती कळताच पालकांनी हॉस्पिटल्समध्ये धाव घेतली. पुना हॉस्पिटलच्या बाहेर पालकांनी गर्दी केली होती.या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी, इंदिरा स्कुलची सहल पुणे-सासवड रस्त्यावरील गरड गावाजवळ गिरीवन येथील इडन ऑफ व्हॉइसेस फार्म येथे गेली होती. कृषी पर्यटनासाठी गेलेल्या सहलीत ट्रॅक्टरमधून फेरफटका मारण्याची सुविधा फार्म मार्फत करून देण्यात आली आहे सहलीत पाच बसेस मधून ६ वी ते १० वी पर्यंतचे सुमारे २५० विद्यार्थी गेले होते. इतरांच्या फेऱ्या झाल्यानंतर शेवटच्या फेरीवेळी ट्रॅक्टर ट्रॉलीखाली मोठा दगड आल्याने ट्रॉली पलटली. ट्रॉली अंगावर पडून अनेक मुले जखमी झाली. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. घटनास्थळावरून मुलांना पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये हलविण्यात आले. याबाबत स्कुलच्या मुख्याध्यापिका गीता पिल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या हा एक अपघात आहे इतर सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना सोडले आहे तर दोन विद्यार्थी इतरांपेक्षा थोडे अधिक जखमी असल्याने काळजी म्हणून आम्ही त्यांना आयसीयुत ठेवण्यास सांगितले आहे चिंता कारण्यासारखे काहीही नाही

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातStudentविद्यार्थी