शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 16:31 IST

उद्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भूमीवर संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

मुंबई  - उद्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भूमीवर संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी विरोधीपक्ष नेत्यांच्या  बैठकीत उपस्थित ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण,छगन भुजबळ, नसिम खान, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, अबु आझमी,जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी विरोधपक्ष नेत्यांशी उद्यापासून सुरु होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजा संदर्भात सविस्तर केली. या भेटी नंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत विरोधी पक्षांच्या कोणत्या चर्चा व विषयांचा आग्रह आहे, त्यासंदर्भात विरोधी पक्ष नेत्यांशी बैठकीत चर्चा केली. कारण लोकशाहीप्रक्रियेमध्ये सत्ताधा-यांसोबत विरोधकांचेही तितकेचे महत्त्व आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजात जनतेचे अधिकाधिक प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने विधीमंडळाचे कामकाज सुरळित चालविले गेले पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षांच्या नेत्यांना करण्यात आले.अधिवेशनामध्ये जनतेच्या दृष्टीने चांगल्या विषयांना न्याय देण्याच्या दृष्टीने व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते चर्चेने एकत्र सोडविण्याबाबत विरोधकांनी सहमती दर्शविली. विरोधी पक्षांना सोबत घेऊनच विधीमंडळाचे कामकाज यशस्वी होत असते त्यादृष्टीने आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना आवाहन केले असून विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज नक्कीच व्यवस्थितपणे पार पडेल असा विश्वास संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारणVinod Tawdeविनोद तावडे