शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर परप्रांतीयांची शेती

By admin | Updated: August 26, 2016 02:02 IST

सिडकोने एक रुपयाही मोबदला न देता ऐरोलीमधील कोटकर कुटुंबीयांची १ एकर २४ गुंठे जमीन ताब्यात घेतली

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सिडकोने एक रुपयाही मोबदला न देता ऐरोलीमधील कोटकर कुटुंबीयांची १ एकर २४ गुंठे जमीन ताब्यात घेतली आहे. ट्रान्स हार्बर मार्गासाठी ही जमीन रेल्वेला दिली असून रेल्वेने भाजीपाला पिकविण्यासाठी ती परप्रांतीयाला दिली आहे. जमिनीचे मालक असलेले प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले असून त्याच जमिनीवर परप्रांतीय शेती करत असल्याचे पाहून अन्यायग्रस्त कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. देशातील पहिली स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा करणाऱ्या सिडकोने ४५ वर्षांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा पूर्ण मोबदलाही दिलेला नाही. जमीन गेली व त्याचा मोबदलाही न मिळाल्याने अनेकांना जीवन जगताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाघिवली गावातील ६६ शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिळवणुकीच्या अनेक घटना समोर येवू लागल्या आहेत. अन्याय झालेल्या कुटुंबीयांमध्ये ऐरोलीमधील शालिग्राम गणपत कोटकर यांचाही समावेश आहे. शासनाने त्यांची ३ एकर १८ गुंठे जमीन संपादित केली असून १ एकर ३३ गुंठे ज्ािमनीचा मोबदला दिला आहे. उर्वरित १ एकर २४ गुंठे जमिनीचा मोबदला दिला नाही. मोबदला दिला नसताना व संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना सिडकोने त्या जमिनीच्या सातबारावर त्यांची नावे टाकली आहेत. याशिवाय ही जमीन ऐरोली रेल्वे स्टेशन व रेल्वेमार्ग बनविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला देवून टाकली आहे. रेल्वे ट्रॅक व एनएमएमटी डेपो यांच्यामध्ये असलेली ही जमीन रेल्वेने परस्पर अली नावाच्या व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिली आहे. संबंधित व्यक्तीने या जमिनीवर भाजीपाला व केळीचे उत्पादन घेण्यासाठी ती संदीप चौहान याच्या कुटुंबीयाला दिली आहे. चौहान हे मूळचे उत्तरप्रदेशमधील असून त्यांनी या जमिनीवर भाजीपाला व केळीची लागवड केली आहे. सिडको, शासन व रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची पिळवणूक सुरू केली आहे. जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांना संपादन केलेल्या जमिनीचा मोबदलाही दिला जात नाही. दुसरीकडे तीच जमीन परस्पर परप्रांतीयांना शेतीसाठी दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. शासनाने १९७० मध्ये जमीन संपादनाची कार्यवाही सुरू केल्यानंतर जमिनीचे मूळ मालक गणपत कोटकर यांचे १९७६ मध्ये निधन झाले. यानंतर त्यांचा मुलगा शालिग्राम कोटकर व इतरांनी सिडको, भूसंपादन अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांचे वयही ७१ वर्षे झाले आहे. ज्या जमिनीमध्ये भात व इतर पिके घेतली त्याच जमिनीवर परप्रांतीयांना शेती करताना पाहून दु:ख होत आहे. स्वत:च्या जमिनीचा वापर करता येत नसेल जगून काय फायदा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या मृत्यूस शासन जबाबदारपीडित शेतकरी शालिग्राम गणपत कोटकर तीस वर्षांपासून जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी सिडको, भूसंपादन विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. परंतु संबंधित यंत्रणा १ एकर २४ गुंठे जमिनीचा मोबदलाही देत नाहीत व जमीनही देत नाहीत. यामुळे त्रस्त झालेल्या कोटकर यांनी २९ आॅक्टोबर २०१३ मध्ये प्रांत व इतर कार्यालयास पत्र देवून संपादनाची प्रक्रिया झालेली नसतानाही सातबारा उताऱ्यावरून आमची नावे कमी केली आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय दिला जात नाही. यामुळे मी व माझ्या कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ्य हरवू लागले असून आमच्यापैकी कोणाचाही मृत्यू झाल्यास त्यास संबंधित शासकीय यंत्रणेला जबाबदार धरण्यात यावे असा इशारा दिला आहे. >भूमिपुत्रांच्या जखमेवर मीठरेल्वे स्टेशनला लागून असलेल्या जमिनीवर कोटकर कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांनी शेती केली आहे. परंतु ती जमीनच सरकारने ताब्यात घेतली. मोबदला दिला नाहीच पण ती परस्पर परप्रांतीयांना भाजीपाल्याची शेती करण्यासाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. ज्यांच्या मालकीची जमीन त्या प्रकल्पग्रस्तांना भूमिहीन करून परप्रांतीयांना शेतकरी बनविले जात आहे. तीन दशके प्रकल्पग्रस्त हक्कासाठी संघर्ष करत असताना त्यांची जमीन परप्रांतीयांना देवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची प्रतिक्रिया कोटकर कुुटुंबीयांनी दिली आहे.