पितृपक्षात उमेदवारी अर्ज भरण्याची हिंमत दाखवावी
By Admin | Updated: September 21, 2014 00:29 IST2014-09-21T00:29:28+5:302014-09-21T00:29:28+5:30
सर्वच राजकीय पक्षांनी पिृतपक्षाच्या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन महाराष्ट्र अंधo्रद्धा निमरूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

पितृपक्षात उमेदवारी अर्ज भरण्याची हिंमत दाखवावी
नांदेड: न्यायालयाचे अटक वारंट आहे, अटक करुन जेलमध्ये टाकतो म्हणून लाच मागणाऱ्या वारंट अंमलदारासह एका पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध कंधार ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
या प्रकरणातील तक्रारदार व त्यांच्या वडिलाविरोधात (रा़ बाभूळगाव) न्यायालयाने अटक वारंट काढले होते़ तुमच्या नावे अटक वारंट असून तुम्ही आमच्यासोबत चला, तुम्हाला अटक करुन रात्रभर जेलमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करतो म्हणून वारंट अंमलदार पोलिस हेडकॉन्स्टेबल मारोती उमाटे व पोलिस कॉन्स्टेबल अशोक नारायण केंद्रे या दोघांनी धमकी दिली़ अपमानित करुन अटक न करण्यासाठी दीड हजार रुपये लाचेची मागणी केली़ तक्रारदारांनी भीतीपोटी सदरील कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये दिले़ त्यावेळी जमादार उमाटे यांनी कोर्टात जावून अटक वारंट रद्द करुन त्याच्या पावत्या व उर्वरित पैसे आणून देण्यास सांगितले़ दरम्यान, तक्रारदारांनी लाचेची मागणी होत असल्याची लेखी फिर्याद नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दिली़
२८ आॅगस्ट रोजी आयोजित केलेल्या सापळ्यात पोकॉ़ केंद्रे यांची २०० रुपये लाचेची मागणी सिद्ध झाली़ त्यावरुन आरोपी लोकसेवक बाबाराव मारोती उमाटे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १३ (१)ड सह कलम १३(२) व पोकॉ़ अशोक केंद्रे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ सह कलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)