शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीतून आई-वडिलांची आत्महत्या, थोरला राब राब राबला, धाकटे तिन्ही भाऊ झाले पोलिस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 10:12 IST

माखणी (ता. गंगाखेड) गावातील या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलिस भरतीत अंतिम निवड झाली आहे. या संघर्षमयी प्रवासात या तिन्ही भावंडांना थोरला भाऊ आकाश यांचे पाठबळ मिळाले.  

- ज्ञानेश्वर भाले लोकमत न्यूज नेटवर्क  परभणी : लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जगण्याचा संघर्ष करत आश्रमशाळेतून शिक्षणाची वाट निवडताना सिसोदे कुटुंबातील तिन्ही भावंडांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाला गवसणी घातली. माखणी (ता. गंगाखेड) गावातील या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलिस भरतीत अंतिम निवड झाली आहे. या संघर्षमयी प्रवासात या तिन्ही भावंडांना थोरला भाऊ आकाश यांचे पाठबळ मिळाले.  

वयाच्या आठव्या वर्षीच कृष्णा, ओंकार, आकार या सिसोदे बंधूंच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर दुसरीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत त्यांनी खानापूर फाटा येथील आश्रमशाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. परंतु, ही शाळा बंद झाली. पुढे काय करणार, या विवंचनेत असताना त्यांना परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शैक्षणिक संस्थेत मोफत सहारा मिळाला. तिथे त्यांनी आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील महिला व बालविकास विभागाच्या वसतिगृहात काम करून शिक्षणाचा प्रवाह सोडला नाही. 

या दरम्यान पोलिस भरतीची जाहिरात आल्याने तिन्ही भावंडांपैकी कृष्णा आणि आकार यांनी मुंबई, तर ओंकार याने परभणीत अर्ज भरला. या भावंडांच्या कष्टाचे फलित म्हणून तिघांचीही निवड झाली, हे विशेष. 

पहिल्याच प्रयत्नात यशएरव्ही स्पर्धा परीक्षेसह विविध भरतीची तयारी करताना मुलांना नोकरीसाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. परंतु, कृष्णा केशव सिसोदे (२३), ओंकार केशव सिसोदे (२१), आकार केशव सिसोदे (२१) या तिन्ही भावंडांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली.   

थोरला आजही सालगडी  कृष्णा, ओंकार आणि  आकार लहान असतानाच आई-वडिलांनी नापिकी शेतीमुळे आत्महत्या केली होती. त्यामुळे मोठा भाऊ  आकाश यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. मिळेल ते काम करून त्यांनी भावंडांना शिक्षणासाठी मदत करून मायेची ऊब दिली. आकाश आजही माखणी गावात सालगडी म्हणून काम करत आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस