औरंगाबाद बसस्थानकात पार्सलचा स्फोट, ७ ते ८ प्रवासी जखमी
By Admin | Updated: June 21, 2016 13:48 IST2016-06-21T11:47:17+5:302016-06-21T13:48:33+5:30
औरंगाबाद बसस्थानकात मंगळवारी सकाळी एका पार्सलचा स्फोट होऊन अॅसिड उडाल्याने ७-८ प्रवासी जखमी झाले.

औरंगाबाद बसस्थानकात पार्सलचा स्फोट, ७ ते ८ प्रवासी जखमी
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. २१ - पाथर्डी -पैठण एसटीत पार्सलचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात घडली. या स्फोटामुळे अंगावर अॅसिड उडून एका हमालासह ४ जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्टेशनरीच्या नावाखाली या पार्सलमध्ये केमिकल पाठवण्यात येत होते. या घटनेवरून पुन्हा एकदा एसटी चा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. हे पार्सल औरंगाबादहुन पाथर्डी येथील आनंद महाविद्यालयाच्या प्रोयोगशाळेसाठी पाठवण्यात येत होते. पार्सल पाठवणाऱ्या विशाल इंटरप्राइजेस विरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.