परभणीत सर्वाधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 04:18 IST2017-02-18T04:18:34+5:302017-02-18T04:18:34+5:30
१५ जिल्हा परिषदा व १६५ पंचायत समित्यांसाठी राज्यात गुरुवारी सरासरी ६८.४१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७४.४७ टक्के

परभणीत सर्वाधिक मतदान
मुंबई : १५ जिल्हा परिषदा व १६५ पंचायत समित्यांसाठी राज्यात गुरुवारी सरासरी ६८.४१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७४.४७ टक्के मतदान हे परभणी जिल्हा परिषदेसाठी झाले. या निवडणुकीसाठी ४ हजार २८९ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांत कमी मतदान जळगावमध्ये (६३.२९) झाले.
मतदानाची जिल्हानिहाय टक्केवारी अशी - अहमदनगर ६७.६७, औरंगाबाद ७०.२२, बीड ७०.३५, बुलडाणा ६७.५८, चंद्रपूर ७०.०२, गडचिरोली ७१.४४, हिंगोली ७३.७७, जळगाव ६३.२९, जालना ७०.६९, लातूर ६४.७०, नांदेड ६९.६१, उस्मानाबाद ६५.२०, परभणी ७४.४७, वर्धा ६७.२५, यवतमाळ ६८.६३. निकाल २३ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
एकूण मतदार १९७३१४७८
झालेले मतदान १३४९७७२४
पुरुष मतदार ७२०६७८८
महिला मतदार ६२९०९३०
इतर ०६
सरासरी मतदान ६८.४१
गुरुवारी झालेल्या मतदानात सर्वाधिक ७४.४ टक्के मतदान हे परभणी जिल्हा परिषदेसाठी झाले. तर सर्वांत कमी ६२.२९ मतदान जळगावमध्ये झाले.