परभणी धान्य घोटाळा; १३ जण अटकेत
By Admin | Updated: January 24, 2017 03:55 IST2017-01-24T03:55:50+5:302017-01-24T03:55:50+5:30
येथील पुरवठा विभागाच्या गोदामातून ४ कोटी ९७ लाख रुपये रेशनच्या धान्याचा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी तेराव्या

परभणी धान्य घोटाळा; १३ जण अटकेत
परभणी : येथील पुरवठा विभागाच्या गोदामातून ४ कोटी ९७ लाख रुपये रेशनच्या धान्याचा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी तेराव्या आरोपीस सोमवारी सायंकाळी शहरातून अटक केली़
परभणी पुरवठा विभागाच्या गोदामातून धान्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याची घटना आॅगस्टमध्ये उघडकीस आली़ त्यानंतर गुन्हा दाखल होऊन ३७ आरोपींवर परभणी न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली होती़ त्यापैकी १० जणांना न्यायालयाने जामीन दिला आहे़ उर्वरित दोन आरोपी परभणीतील कारागृहात आहेत़ सोमवारी कोतवाली पोलिसांनी आरोपी जुगलकिशोर दरक यास अटक केली़ धान्य घोटाळ््यात आणखी २४ आरोपींना अटक होणे बाकी आहे. (प्रतिनिधी)