परप्रांतीय बोटी पकडणे अशक्य
By Admin | Updated: March 31, 2015 02:31 IST2015-03-31T02:31:09+5:302015-03-31T02:31:09+5:30
परप्रांतीय बोटींची स्पीड २०० च्यावर असल्याने त्या बोटी पळून जाण्यात यशस्वी होतात. शिवाय आपल्याकडे गस्ती नौकाही नाहीत,

परप्रांतीय बोटी पकडणे अशक्य
मुंबई : परप्रांतीय बोटींची स्पीड २०० च्यावर असल्याने त्या बोटी पळून जाण्यात यशस्वी होतात. शिवाय आपल्याकडे गस्ती नौकाही नाहीत, अशी कबुली महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. पर्सेसिन नेट वापरावर यापुढे बंदी असेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कोकण व परिसरातील सागरी क्षेत्रात परप्रांतीय ट्रॉलर मासेमारीसाठी येतात आणि आपल्या मच्छीमारांना उपासमारीला सामोरे जावे लागते, यावर जितेंद्र आव्हाड, किसन कथारे, भास्कर जाधव आदींनी लक्षवेधी मांडली होती. परप्रांतीय बोटी देवगड, विजयदुर्गसमोरील समुद्रात १२ नॉटिकलच्या आत येतात. आपले अधिकारी आणि बोटी फक्त किनाऱ्यावर गस्त घालत असतात़ त्यांना पकडण्यास गेले तर ते त्यांच्या लोखंडी बोटींनी आपल्या लाकडाच्या बोटींवर हल्ले करतात, असे सदस्यांनी सभागृहात सांगितले. त्यावर बोलताना खडसे म्हणाले, की या परप्रांतीय बोटी कर्नाटक,
गोवामार्गे येतात. त्यांच्याकडे आधुनिक बोटी असल्याने त्यांना पकडता येत नाही. गोवामार्गे त्या पसार होतात, अशी हतबलता व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)