शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

'26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला'; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 08:48 IST

निवृत्त एसीपी शमशेर खान-पठाण यांनी पत्राद्वारे हे आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई: एका पाठोपाठ एक अनेक आरोप लागल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. अनेक आरोप असलेल्या परमबीर सिंहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांतील निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल फोन गायब/लपवून ठेवल्याचा आरोप केला आहे.

निवृत्त एसीपी शमशेर खान-पठाण यांनी मुंबईच्या सीपींना लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. पठाण यांनी पत्रात लिहिले आहे की, डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पीआय माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाईल फोन सापडल्याचे सांगितले होते, जो पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता.

पण, गिरगाव चौपाटीच्या ज्या सिग्नलवर कसाबला पकडले होते, त्या ठिकाणी परमबीर सिंह आले होते आणि त्यांनी तो मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला. पण, त्यांनी तो फोन तपास अधिकारी रमेश महाले यांना द्यायला हवा होता. या मोबाईलवरुन हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हॅंडलरशी संवाद साधत होते. त्याफोनद्वारे पाकिस्तानी हँडलर आणि त्यात कोणी भारतीय आहे का, हे कळू शकले असते. आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, असं पठाण यांनी म्हटलं आहे. 

परमबीर सिंह चंदिगढमध्ये, लवकरच मुंबईला येणार

परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा अखेर समजला आहे. सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलासा दिल्यानंतर परमबीर सिंग समोर येतील अशी शक्यता होती. मात्र अद्यापपर्यंत ते समोर आलेले नाहीत. मात्र त्यांनी स्वत:चा ठावठिकाणा सांगितला आहे. आपण चंदिगढमध्ये असून तपासाला सहकार्य करण्यासाठी लवकरच मुंबईला जाऊ, अशी माहिती सिंग यांनी दिली आहे. मुंबई, ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. मार्च महिन्यापासून सिंह यांचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नाही. ते देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सिंह यांच्या वकिलांना त्यांचा ठावठिकाणा विचारला. त्यावर सिंह देशाबाहेर पळून गेले नसून ते देशातच असल्याचं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगPoliceपोलिस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला