शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Param Bir Singh : "परमबीर यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 13:35 IST

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांचा आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब असतील, पळून गेले असतील तर गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून गेले कसे? याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मंत्री मलिक यांना दिलं आहे.

परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेले मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना? रेशनकार्ड, आधार कार्ड हे इथलेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करीत असल्याचा आरोपही शेलार केला.

"ते पळून गेले असतील तर ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय.परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. ते जर सापडले तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल, त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, हा.एक डाव आहे," असा दावा त्यांनी यावेळी केला.

निलंबित करण्याची तयारीमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांचा पगार या महिन्यापासून रोखण्यात आला आहे. याशिवाय परमबीर सिंग यांना निलंबित करण्याची तयारी सुरु आहे. ठाणे, मुंबई गुन्हे शाखेकडे त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याविरोधात अदखलपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता परमबीर सिंग यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असं तपास अधिकारी रमेश महाले यांनी सांगितलं. परमबीर सिंग नेपाळमार्गे बेल्जिअमला गेल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. याबाबत रमेश महाले म्हणाले की, जर हा दावा खरा ठरला तर परमबीर सिंग यांच्या बेल्जिअम येथील पत्त्यावर नोटीस पाठवली जाऊ शकते.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगAshish Shelarआशीष शेलारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी