परभणी बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल
By Admin | Updated: August 18, 2016 03:11 IST2016-08-18T03:11:37+5:302016-08-18T03:11:37+5:30
सुमारे १३ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, परभणी जिल्हा न्यायालय या प्रकरणात गुरुवारी अंतिम निकाल देणार आहे़

परभणी बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल
परभणी : सुमारे १३ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, परभणी जिल्हा न्यायालय या प्रकरणात गुरुवारी अंतिम निकाल देणार आहे़
परभणी शहरातील महम्मदिया मशिदमध्ये २१ नोव्हेंबर २००३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर ३४ जण जखमी झाले होते़ पोलिसांनी संजय चौधरी, मारोती वाघ, योगेश देशपांडे आणि राकेश धावडे या चौघांना अटक करून त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवले़ न्यायालयात १३ वर्षांनी सुनावणी पूर्ण झाली असून गुरुवारी जिल्हा न्यायालय निकाल देणार आहे़ (प्रतिनिधी)