पेपरफुटी, कॉपी प्रकरण सामाजिक कलंक - तावडे
By Admin | Updated: March 15, 2015 01:05 IST2015-03-15T01:05:10+5:302015-03-15T01:05:10+5:30
राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटी, कॉपीची प्रकरणे हे सामाजिक कलंक आहेत. परीक्षा होण्याच्या फक्त अर्धा एक तास आधी मोबाइलवरून पेपर फुटत असल्याच्या घटना दुर्दैवी आहेत.

पेपरफुटी, कॉपी प्रकरण सामाजिक कलंक - तावडे
पुणे : राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटी, कॉपीची प्रकरणे हे सामाजिक कलंक आहेत. परीक्षा होण्याच्या फक्त अर्धा एक तास आधी मोबाइलवरून पेपर फुटत असल्याच्या घटना दुर्दैवी आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुढील वर्षापासून दहावी-बारावीच्या परीक्षा स्वतंत्र वर्गात (आयसोलेटेड क्लास) घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
पुण्यातील एका कार्यक्रमासाठी शनिवारी तावडे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तावडे म्हणाले, परीक्षेआधी अर्धा एक तास दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रामध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून पेपरफुटीच्या काही घटना समोर आल्या आहेत. पुढील वर्षापासून परीक्षा स्वतंत्र ठिकाणी घेण्याबाबत विचार सुरू आहे.