पेपर व्हायरल; दोघे अटकेत
By Admin | Updated: March 6, 2017 05:07 IST2017-03-06T05:07:10+5:302017-03-06T05:07:10+5:30
बारावीच्या मराठीच्या पेपरसह परीक्षेच्या काही मिनिटे अगोदर व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली

पेपर व्हायरल; दोघे अटकेत
नवी मुंबई : बारावीच्या मराठीच्या पेपरसह परीक्षेच्या काही मिनिटे अगोदर व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर बारावीच्या इतर काही विद्यार्थ्यांची चौकशी सुरु झाली आहे.
२ मार्च रोजी परीक्षेच्या १५ मिनिटे अगोदर मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परीक्षेचा १० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पेपर दिला जातो. यादरम्यान त्यांना मोबाईल अथवा इंटरनेट वापराला बंदी आहे, तरीही तो व्हॉट्सअपवर शेअर झाल्याची तक्रार बोर्डातर्फे वाशी पोलिसांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राहुल भास्कर (२२) व अझरुद्दीन शेख (२०) अशी त्यांची नावे असून दोघेही मालाडचे रहिवासी आहेत. (प्रतिनिधी)