मुंबई : राज्य सरकारने बुधवारी आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवल किशोर राम हे पुणे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. शीतल तेली-उगले यांची बदली क्रीडा आयुक्त; पुणे या पदावर करण्यात आली. धुळ्याचे जिल्हाधिकारी जे. एस. पापळकर हे आता छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त असतील. चंद्रकांत डांगे यांची बदली मुख्य सचिवांचे सहसचिव या पदावर करण्यात आली. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे मुंबई उपनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री विसपुते आता धुळ्याच्या नवीन जिल्हाधिकारी असतील. भूमिअभिलेख; पुणेचे अतिरिक्त आयुक्त आनंद भंडारी यांची बदली अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली. अहिल्यानगरमध्ये या पदावर असलेले आशिष येरेकर हे अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी असतील.
अधिकारीसध्याचे पदबदलीनंतरचे पद१) नवल किशोर रामनियुक्तीच्या प्रतीक्षेतआयुक्त, पुणे महापालिका२) शीतल तेली उगलेनियुक्तीच्या प्रतीक्षेतआयुक्त, क्रीडा; पुणे३) जे. एस. पापळकरजिल्हाधिकारी धुळेविभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर४) चंद्रकांत डांगेनियुक्तीच्या प्रतीक्षेतसहसचिव, मुख्य सचिव कार्यालय५) सौरभ कटियारजिल्हाधिकारी अमरावतीजिल्हाधिकारी, मुंबई उपनगर६) भाग्यश्री विसपुतेसीईओ, सिडको, छत्रपती संभाजीनगरजिल्हाधिकारी धुळे७) आनंद भंडारीअतिरिक्त आयुक्त; भूमिअभिलेख, पुणेसीईओ, जिल्हा परिषद अहिल्यानगर८) आशिष येरेकरसीईओ, जिल्हा परिषद अहिल्यानगरजिल्हाधिकारी अमरावती.