पाणी टंचाईत किरणने फुलविला पपईचा मळा
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30
तालुक्यातील किरण तुम्बडा या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकरात तैवान पपईची लागवड करून वर्षाकाठी ३ लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले.

पाणी टंचाईत किरणने फुलविला पपईचा मळा
राहुल वाडेकर,
विक्रमगड- तालुक्यात भीषण पाणी टंचाई असतांना या तालुक्यातील किरण तुम्बडा या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकरात तैवान पपईची लागवड करून वर्षाकाठी ३ लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले. यातून खर्च वजा करता २ लाख ७५ हजाराचा निव्वळ नफा त्याना होणार आहे.
खांडया आदिवासी पाडयात राहणाऱ्या किरण तुम्बडा यांनी केवळ शेती करायची म्हणून दोन वर्षापूर्वी वसई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील वाहक पदाचा राजीनामा दिला. माळरान आणि काहीशा खडकाळ जमिनीवर केळी पिकविण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि आपल्या ४ एकर जागेपैकी एका एकरावर तैवान जातीच्या पपईची लागवड केली.
जून २०१५ च्या सुरुवातीला जमिनीची नांगरणी केली त्यानंतर ६ बाय ६ फुट अंतरावर १ बाय दीड फुटाचे खडडे खोदले आणि वाडा तालुक्यतील अनिल पाटील यांच्या नर्सरीतून तैवान या जातीची ८५० रोपे आणून लागवड केली. खत आणि पाण्याचे योग्य ते नियोजन केले. विशेष म्हणजे पाण्याची टंचाई असूनदेखील पपई लागवडीचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला विहीर आणि बोअरवेल खोदून देखील पाणी लागले नाही तरीही त्यांनी हताश न होता २ किमी अंतरावरून धरणाचे पाणी इंजिनच्या सहाय्याने आपल्या विहिरीत साठवून पपईच्या झाडांना देण्यासाठी ड्रीपचा वापर केला.
पपई लागवडीनंतर तुम्बडा यांना साधारणत: ९ महिन्यांनी उत्पन्न मिळण्यास सुरु वात झाली. दर दहा दिवसांनी पपईच्या फळांची तोडणी केली. जाते एक एकरातील पपईच्या लागवडीपासून तुम्बडा यांना या वर्षी ३५ ते ४० टन उत्पन्नाची अपेक्षा आहे सरासरी दर १० रु किलो गृहीत धरला तरी ३ लाख ५० हजाराचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे.
ाजुरी, रोप, खत , औषध यांचा सुरुवातीचा खर्च ७५ हजार वजा केला तरी २ लाख ७५ हजाराचा निव्वळ नफा यावर्षी त्याना होणार आहे. एका झाडापासून दोन वर्ष हे उत्पन्न अपेक्षित आहे .पपईची विक्र ी ते भिवंडीमार्केट मध्ये करीत आहेत. किरण यांच्या पपईलागवडीच्या कामात त्यांच्या घरच्यांचा खूप मोठा हात भार लागतो आहे. किरण यांनी हातची असलेली नोकरी सोडणे घरच्यांना मान्य नव्हते. मात्र नोकरी करून जे आर्थिक उत्पन्न मिळणार नव्हते ते पपईच्या पिकातून एका वर्षात मिळवले आहे यामुळे कुटुंबीय हि समाधान व्यक्त करत आहेत.
>तरुणांनो शेती कडे पाठ फिरवू नका
शेती परवडत नाही म्हणून एकीकडे शेतकरी शहराकडे नोकरीसाठी स्थलांतर करीत असतांना या तरुणाने शेतकाऱ्याने वाहकाची नोकरी सोडून शेती करण्याचा ध्यास घेत शेतीतूनच आपली आर्थिक घडी मजबूत करण्याचा प्रयत्न यशस्वी केला हाच आदर्श शेतीतून पळ काढणाऱ्या आजच्या तरुण शेतकऱ्यांनी घेतल्यास ते त्यांच्या नक्कीच फायद्याचे ठरेल.